BJP MLA : समाजमाध्यमांवर सक्रिय व्हा, भाजप आमदारांना सूचना

आमदारांच्या समाजमाध्यमांवरील कामगिरीबद्दल पक्ष नेत्यांनी नाराजी व्यक्त करीत फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X (एक्स) यावरील सक्रिय सहभाग वाढवण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे त्याचा आढावा घेण्यात येणार असून २५ जानेवारीपर्यंत काही ध्येय पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

220
BJP MLA : समाजमाध्यमांवर सक्रिय व्हा, भाजप आमदारांना सूचना

सुजित महामुलकर

महाराष्ट्रतील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची (BJP MLA) गुरुवारी (१४ डिसेंबर) नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाने आमदारांच्या प्रगतिपुस्तकावरून त्यांची झाडाझडती घेतली. आमदारांनी या गोष्टीची धास्ती घेतली असून समाजमाध्यमांवरील आपला सक्रिय सहभाग वाढवून प्रगतिपुस्तकातील ‘लाल’ असलेला शेरा ‘हिरवा’ करावा, असा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे. यासाठी आमदारांना २५ जानेवारीपर्यंतची ‘डेड-लाईन’ देण्यात आली आहे.

बैठकीला हजर नसलेल्यांची झाडाझडती

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पर्श्वभूमीवर भाजपने आपल्या आमदारांची (BJP MLA) बैठक आयोजित केली होती. यात, काही दिवसांपूर्वी मुंबईत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक पार पडली त्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या आमदारांची झाडाझडती घेण्यात आली. तसेच,यापुढे बैठकीला आमंत्रित आमदारांनी गैरहजर राहू नये अशा सूचना देण्यात आल्या.

(हेही वाचा – Surat Diamond Bourse : पेंटागॉन पेक्षाही जबरदस्त ‘सूरत डायमंड बोर्स’, PM मोदींच्या हस्ते उदघाटन)

ध्येय पूर्ण करा

आमदारांच्या (BJP MLA) समाजमाध्यमांवरील कामगिरीबद्दल पक्ष नेत्यांनी नाराजी व्यक्त करीत फेसबुक (facebook), इन्स्टाग्राम (Instagram) आणि X (एक्स) यावरील सक्रिय सहभाग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याचा आढावा घेण्यात येणार असून २५ जानेवारीपर्यंत काही ध्येय (target) पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपस्थित असलेल्या एका आमदाराने दिली.

कामगिरीचा आढावा घेतला जाणार

ध्येयपुर्तीसाठी जी उद्दीष्ट पूर्ण करायची आहेत त्याचा प्रगती अहवाल तयार करण्यात येणार असून त्यावर आमदारांची (BJP MLA) कामगिरी निश्चित केली जाईल. उदाहरणार्थ, फेसबुकवर आमदाराचे किमान १०,००० फॉलोअर्स असणे आवश्यक आहे अन्यथा त्याची कामगिरी ‘Poor’ (असमाधानकारक) या श्रेणीत मोडेल. १०,०००-२५,००० फॉलोअर्स संख्या असणारा आमदार Average (सरासरी) मध्ये, २५,०००-५०,००० फॉलोअर्स असणाऱ्यांची कामगिरी Good (चांगली) समजली जाईल तर ५०,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स असणारे आमदार Exellent (उत्कृष्ट) कामगिरी करणारे या श्रेणीत गणले जातील. अशाचप्रकारे इन्स्टाग्राम आणि ‘X’ वरील कामाची श्रेणी निश्चित करण्यात येईल.

(हेही वाचा – Accident : नागपुरात भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू)

आमदाराचे भवितव्य कामगिरी अहवालावर

या कामगिरीची नोंद करण्यात येणार असून पक्षश्रेष्ठीना याचा अहवाल सादर करण्यात येईल व त्यावर संबंधित आमदाराच्या (BJP MLA) तिकिटाचे भवितव्य अवलंबून असेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.