कोरोना झाल्याचे समजून पतीला घरातील गॅलरीत विलगिकरणात ठेवल्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना नवी मुंबईतील पनवेल येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून करून त्याची रवानगी कोविड सेंटर येथे करण्यात आली आहे.
५ दिवसांपासून पती होता क्वारंटाईन!
संतोष पांडुरंग पाटील (४०) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. पनवेलमधील करंजाडे येथील साईसत्यम इमारत येथे पत्नी संध्या (३५) सोबत संतोष पाटील हा राहण्यास होता. संतोष हा काही दिवसापासून आजारी होता, कोरोनाचे लक्षण असल्यामुळे पत्नी संध्या हिने पतीला डॉक्टरकडे उपचारासाठी घेऊन न जाता घरातील गॅलरीत चार ते पाच दिवसांपासून विलगिकरणात ठेवले होते.
(हेही वाचा : काय आहे ‘त्या’ व्हायरल व्हिडिओ मागील सत्य?)
चाचणी केल्यावर पती निघाला पॉझिटिव्ह!
या प्रकाराचा राग येऊन संतोष याने शनिवारी सकाळी पत्नीसोबत भांडण केले, या भांडणातून संतोषने गॅलरीतून बाहेर येऊन घरातील कोयत्याने पत्नीवर वार केले त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन पती संतोष पाटील याला अटक करून त्याची अँटीजेन चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला जवळच्याच कोविड सेंटरमध्ये पोलिसांच्या देखरेखीत ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community