Dharavi Project: धारावी प्रकल्पात टीडीआर घोटाळा असेल, तर ते पाप उद्धव ठाकरेंचे; आशिष शेलारांचा घणाघात

176
Dharavi Project: धारावी प्रकल्पात टीडीआर घोटाळा असेल, तर ते पाप उद्धव ठाकरेंचे; आशिष शेलारांचा घणाघात
Dharavi Project: धारावी प्रकल्पात टीडीआर घोटाळा असेल, तर ते पाप उद्धव ठाकरेंचे; आशिष शेलारांचा घणाघात

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून (Dharavi Project) ठाकरे गटाने शनिवारी मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्च्याला ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा टीडीआर प्रकल्प असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला त्यांच्या टीकेवर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले.

(हेही वाचा – Land Rover Range Rover Evoque 2023 : नवीन वर्षात रेंज ओव्हर इलोकला मिळणार फेसलिफ्ट )

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरे गटाने अदानी समुहाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या टेंडरच्या अटी, कार्यपद्धतीचे आणि त्याबाबतीतले धोरणात्मक निर्णय उद्धव ठाकरेंच्याच काळात झाले आहेत. टेंडरमध्ये गडबड असेल, टीडीआर घोटाळ असेल, तर सर्वस्वी पाप उद्धवजींचे आहे, असा घणाघात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, धारावीतून निघणाऱ्या ठाकरे गटाच्या मोर्चाला थांबवण्याकरिता दिल्लीतून दबाव आहे, अशी टीकाही संजय राऊतांनी केली. त्यावर आशिष शेलार म्हणाले की, तुमच्यावर कोणाचा दबाव होता मग? तुमच्यावर शरद पवारांचा दबाव होता का? पवारांनी दिल्लीतून फोन केला होता का? संजय राऊत रोज गांजा आणि चिलीम ओढूनच पत्रकार परिषदेला बसतात. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात सातत्य आणि सत्यता नसते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.