Champions Trophy in Pakistan : पाकिस्तानच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर शिक्कामोर्तब?

पाक बोर्डाकडून आयसीसीशी केलेल्या कराराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. 

218
Champions Trophy in Pakistan : पाकिस्तानच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर शिक्कामोर्तब?
Champions Trophy in Pakistan : पाकिस्तानच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर शिक्कामोर्तब?
  • ऋजुता लुकतुके

पाक बोर्डाकडून आयसीसीशी केलेल्या कराराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. (Champions Trophy in Pakistan)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनासाठी आयसीसीबरोबर करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे २०२५ ची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पाकिस्तानमध्येच होणार हे निश्चित झालं आहे. पाक बोर्डाकडून झका अश्रफने करारावर सही केली. (Champions Trophy in Pakistan)

पाक बोर्डाचे व्यवस्थापकीय मंडळाचे प्रतिनिधी म्हणून झका अश्रफ आणि आयसीसीकडून जोनाथन हॉल यांनी करारावर स्वाक्षरी केलेल्या आयसीसीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. पाकिस्तानने यापूर्वी आयसीसीची स्पर्धा थेट १९९६ मध्ये भरवली होती. त्यानंतर २००९ सालच्या चॅम्पियन्स कंरडकाचं यजमानपद पाकला देण्यात आलं होतं. शिवाय २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे सामनेही पाकमध्ये होणार होते. (Champions Trophy in Pakistan)

(हेही वाचा – Paral TT Flyover : परळ टीटी उड्डाणपुलाची येत्या काही दिवसात मोठी दुरूस्ती)

भारतीय संघाने एकदाही पाकिस्तानचा दौरा का केला नाही?

पण, श्रीलंकन संघावर २००९ मध्ये लाहोरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि पुढे पाकसाठी चित्रच बदललं. आताही पाकिस्तानसाठी एक मोठं आव्हान असेल, ते म्हणजे, सगळ्या देशांना पाकमध्ये खेळण्यासाठी राजी करण्याचं आणि त्यातही भारतीय सरकारकडून भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळेल याची परवानगी मिळवणं हे आणखी मोठं आव्हान आहे. (Champions Trophy in Pakistan)

यावरूनच पाकिस्तानने यापूर्वीही अनेकदा आवाज उठवला आहे. अलीकडे पाकिस्तानमध्ये झालेल्या आशिया चषकातही भारताचे सामने श्रीलंकेत हलवावे लागले होते. यापूर्वी. २००८ च्या पाकमध्ये झालेल्या आशिया चषक सामन्यांत भारतीय संघ खेळला होता आणि त्यानंतर भारतीय संघाने एकदाही पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. (Champions Trophy in Pakistan)

(हेही वाचा – Dharavi Project: धारावी प्रकल्पात टीडीआर घोटाळा असेल, तर ते पाप उद्धव ठाकरेंचे; आशिष शेलारांचा घणाघात)

खेळाडूंना सुरक्षा पुरवण्याविषयी करार

आताही चॅम्पियन्स करंडकाचं यजमानपद मिळवताना पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सुरक्षेचं हमीपत्र आयसीसीला दिलं आहे. आणि पाक बोर्डाने पाक सरकारला खेळाडूंना सुरक्षा पुरवण्याविषयी करार केला असल्याचं पाक बोर्डाचं म्हणणं आहे. (Champions Trophy in Pakistan)

२००९ पासून पाकमध्ये क्रिकेट मालिका फारशा होत नाहीत. त्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाच्या तिजोरीत खडखडाट आहे. आणि ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पाक बोर्डाला चॅम्पियन्स करंडकाच्या आयोजनाची संधी साधायची आहे. पण, भारताचा विरोध आणि इतर देशांची दोलायमान अवस्था यामुळे पाक बोर्डाचा जीव मागचे काही महिने वर खाली होत होता. आता आयसीसीबरोबरच्या कराराची एक पायरी तरी पार पडली आहे. (Champions Trophy in Pakistan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.