संसदेचं कामकाज सुरू असताना, १३ डिसेंबरला २ जणांनी संसदेत घुसखोरी केली होती. या प्रकरणातील सहाव्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या आरोपीचे नाव अद्याप उघड केलेले नाही.
ललित झा याने १४ डिसेंबरच्या रात्री आत्मसमर्पण केले होते. बेरोजगारी आणि महागाईमुळे ही घटना घडल्याचे कॉंग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी म्हणाले, दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून उडी मारलेल्या सागर शर्मा आणि मनोरंजन यांनी ७ स्मोक कॅन नेले होते.
(हेही वाचा –Maharashtra Legislative Council: ठाकरेंनी फक्त आश्वासन दिलं, पण फडवीसांनी करून दाखवलं; अण्णा हजारे यांची टीका )
आरोपींनी गुगलच्या माध्यमातून संसदेच्या आजूबाजूच्या परिसराची रेकी केल्याचेही पोलिसांनी सांगितले. संसदेतील जुने व्हिडियोही पाहिले, कारण त्यांना संसदेतील सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती जाणून घ्यायची होती. इतकंच नाही, तर आरोपींनी आपआपसात बोलण्याचा मार्गही शोधून काढला होता. त्यामुळे पोलिसांना त्यांना पकडता आले नाही. सर्व आरोपी एकमेकांशी बोलण्यासाठी सिग्नल अॅपचा वापर करत होते. जेणेकरून ते कोणाच्याही हाती लागू नयेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी याबाबत पुढे दिलेली माहिती अशी की, आरोपींचा सर्वात मोठा उद्देश मीडियामध्ये प्रसिद्ध होणे हा होता. त्यामुळे अधिवेशन काळात संसदेत प्रवेश करण्याची योजना तयार करण्यात आली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community