Unauthorized Hoarding: नाशिक शहरात दोन दिवसांत १२२ होर्डिंग्ज हटवले, पोलीस आयुक्तांकडून ‘मोक्का’ कारवाई

शहरातील चौक, दिशादर्शक फलक झाकून त्यावर अनधिकृतरित्या होर्डिंग्जबाजी केली होती.

191
Unauthorized Hoarding: नाशिक शहरात दोन दिवसांत १२२ होर्डिंग्ज हटवले, पोलीस आयुक्तांकडून 'मोक्का' कारवाई
Unauthorized Hoarding: नाशिक शहरात दोन दिवसांत १२२ होर्डिंग्ज हटवले, पोलीस आयुक्तांकडून 'मोक्का' कारवाई

नाशिक शहरात दोन दिवसात सुमारे १२२ होर्डिंग्स हटवण्यात आले, तर शहराच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता वाढदिवसाचे होर्डिंग (Unauthorized Hoarding) उभारणाऱ्यांविरोधात शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी दणका दिला आहे.

होर्डिंग उभारून भाईगिरी करणाऱ्यांविरोधात सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी होर्डिंग्ज लावून भाईगिरी करणाऱ्यांविरोधात मोक्का अन्वये कारवाईचे संकेत दिले आहेत.

(हेही वाचा – Mission Lakshyavedh : खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ राबवणार- संजय बनसोडे )

शहरातील चौक, दिशादर्शक फलक झाकून त्यावर अनधिकृतरित्या होर्डिंग्जबाजी केली होती. महापालिकेच्या अधिकृत जागांवरही भाईगिरी करणाऱ्यांकडून अनधिकृतरित्या बॅनरबाजी करीत शहराच्या विद्रुपीकरणात भरच घातली होती. यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस ठाण्याच्या प्रभारींना अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलिसांनी मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या मदतीने कारवाई करीत गेल्या २ दिवसांत १२२ होर्डिंग्ज काढले. यामुळे शहरात पर्यटनाच्या निमित्ताने येणाऱ्यांना मोठा दिला मिळाला. या कारवाईचे सुजाण आणि जागरुक नाशिककरांनी स्वागत केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.