शेअर बाजारासाठी (Share Market) डिसेंबर महिना फलदायी ठरला आहे. या महिन्यात शेअर बाजारात तुफान तेजी पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांची केवळ ११ दिवसांत २२ लाख कोटी रुपयांहून जास्त कमाई केली आहे.
सकाळपासून सेन्सेक्सने एक नवा रेकॉर्ड रचला असून पहिल्यांदा ७१ हजार अंकाचा आकडा पार केला आहे. बीएसई सेन्सेक्स ९६९.५५ अंकांच्या उसळीनंतर ७१,४८३.७५ अंकांच्या रेकॉर्डवर स्थिरावले. निफ्टीने १०४ अंकाच्या वाढीसोबत २१ हजार २८७ अंकावर सुरुवात केली. सेन्सेक्स पहिल्यांदा ७०,८०० वर उघडला.
किआ सोनेटच्या नव्या व्हर्जनची बुकिंग
सध्या शेअर मार्केटमध्ये आझाद इंजिनियरिंग कंपनीने आपला ७४० कोटी रुपयांचा आयपोओसाठी मुल्य निर्धारित केले आहे. हा आयपीओ २० डिसेंबरला ओपन होऊन २२ डिसेंबरला बंद होईल, तर किआ सोनेटच्या नव्या व्हर्जनची बुकिंग २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. कंपनीने या कारला अॅडव्हान्स फिचर्ससोबत लॉंच केला आहे. या कारच्या किमतीचा अद्याप खुलासा झालेला नाही, पण या कारमध्ये नवीन हेडलाइट्स आणि डीआरएल सेटअप, फ्रंट ग्रिलला अपडेट दिले आहेत.