Dilip Walse Patil: इथेनॉल निर्मिती, कांदा प्रश्नाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार, दिलीप वळसे पाटील यांची माहिती

158

सहकारी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती, कांदा आणि इतर प्रश्नाबाबत नवी दिल्ली येथे सोमवारी, १८ डिसेंबरला केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिष्टमंडळाला भेट देणार असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil) यांनी दिली.

सहकारी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती करण्याबाबत केंद्र सरकारने काही मर्यादा दर्शवणारा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात सुधारणा करून निर्णय मागे घेतला असला, तरही या निर्णयात अनेक त्रुटी आहेत, असे दिलीप वळसे पाटील यांनी मंचर (ता. आंबेगाव) येथे शनिवारी, १६ डिसेंबरला झालेल्या पत्रकार परिषदेवेळी पत्रकरांना सांगितले.

(हेही वाचा – India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका १७ डिसेंबरपासून सुरू, वेळापत्रक जाणून घ्या… )

याविषयी पुढे ते म्हणाले की, देशातील सहकारी साखर कारखान्यांचे साखर उत्पादन कमी झाले आहे. साखर उत्पादनात वाढ होण्यासाठी कारखान्यांना इथेनॉल निर्मिती करता येणार नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यामुळे साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून विरोध झाल्यामुळे केंद्र सरकारकडून निर्णय मागे घेऊन काही सुधारणा केल्या आहेत, पण त्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्यामुळे सुधारणा करण्याची गरज आहे तसेच कांदा उत्पादकांचे प्रश्न आणि महाराष्ट्रातील इतरही प्रश्नांबाबत सोमवारी दिल्ली येथे शहा यांच्यसोबत शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.