उबाठा सेनेचा धारावी मधील मोर्चा हा स्वतःच्या आणि काही विकासकांच्या आर्थिक फायद्यासाठी आहे, अशी टीका शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केली असून हा मोर्चा म्हणजे धारावीच्या पुनर्विकासात (Dharavi Redevelopment) खोडा घालण्याचा प्रयत्न असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले. (Rahul Shewale)
आपल्या चेंबूर येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार शेवाळे म्हणाले की, धारावी पुनर्विकास प्रकल्पाची (Dharavi Redevelopment Project) दुसरी निविदा देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याच कार्यकाळात ठरविण्यात आलेल्या अटी आणि शर्ती नुसार काढण्यात आलेली असून आता या पुनर्विकास प्रकल्पाबाबत शंका उपलब्ध करून त्याला विरोध करणे, हे दुर्दैवी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सांगितल्या प्रमाणे हा मोर्चा म्हणजे काही विकासकांची सुपारी घेऊन काढलेला मोर्चा आहे. टिडिआरचा मुद्दा हा तांत्रिक असून आधीच्या अटी आणि शर्ती नुसारच आहे. (Rahul Shewale)
(हेही वाचा – Indian Navy: माल्टा देशाचे जहाज समुद्री चाच्यांकडून हायजॅक; भारतीय नौदलाकडून युद्धनौका, विमान मदतीसाठी रवाना)
एकीकडे धारावीतील जनतेसाठी मोर्चा काढणाऱ्या उबाठा सेनेने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पत्राचाळ आणि इतर अनेक प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या मराठी लोकांसाठी का मोर्चा काढला नाही? असा सवालही खासदार शेवाळे यांनी विचारला. (Rahul Shewale)
५ हजार मराठी कुटुंब अजूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत
शिवसेना भवनाच्या (Shiv Sena Bhavan) पुनर्विकासाच्या वेळेस २००९ मध्ये पाडण्यात आलेल्या ८ इमारतींमधील १०८ मराठी कुटुंबांना अद्यापही घर मिळाले नाही. तसेच दादर आणि आसपासच्या परिसरातील सुमारे ५ हजार मराठी कुटुंब अजूनही हक्काच्या घरासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी देखील मोर्चा माननीय माजी मुख्यमंत्र्यांनी काढायला हवा, असाही सल्ला खासदार शेवाळे यांनी दिला. (Rahul Shewale)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community