- ऋजुता लुकतुके
ज्योती वेन्नमने न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. (Jyothi Surekha Vennam on Khel Ratna Snub)
यंदाचा ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी (Major Dhyan Chand Award) बॅडमिंटनमधील दुहेरीची जोडी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांचं नामांकन झालं आहे. पण, त्यामुळे देशातील नंबर वन कम्पाऊंड तिरंदाज ज्योती वेन्नम (Jyothi Surekha Vennam) हिला राग आला आहे. आशियाई क्रीडा (Asian Games) स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात चांगली कामगिरी करूनही या पुरस्कारासाठी डावलण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. इतकंच नाही तर हा दुजाभाव आहे असं म्हणत तिने कोर्टात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. (Jyothi Surekha Vennam on Khel Ratna Snub)
(हेही वाचा – Parliament Security Breach: संसद घुसखोरीतील ६वा आरोपी पकडला)
ज्योतीच्या नावावर ४ सुवर्ण आणि १ कांस्य
मागच्या ६ महिन्यांत ज्योतीने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १३ पदकं मिळवली आहेत. यात वैयक्तिप पदकांबरोबरच सांघिक आणि मिश्र सांधिक पदकांचा समावेश आहे. चीनच्या होआंगझाओमध्ये झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत तिने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं. तर त्यानंतर झालेल्या जागतिक स्पर्धेत तिच्या नावावर ४ सुवर्ण आणि १ कांस्य पदक जमा आहे. (Jyothi Surekha Vennam on Khel Ratna Snub)
१ जानेवारी २०१९ पासूनचं ऑलिम्पिक कॅलेंडर पदकासाठी गुण मोजताना गृहित धरलं गेलं होतं. या कालावधीत ज्योतीने ७ विश्वविजेतेपद पदकं, ३ आशियाई सुवर्ण आणि एकूण ५३ आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली आहेत. तिचं वयही २७ वर्षांचं आहे. (Jyothi Surekha Vennam on Khel Ratna Snub)
(हेही वाचा – Rahul Shewale : उबाठा सेनेचा धारावीतील मोर्चा हा स्वतःच्या आणि विकासकांच्या आर्थिक फायद्यासाठी; राहुल शेवाळेंची टीका)
खेलरत्न पुरस्कारासाठी ज्या प्रकारे खेळाडूला गुण दिले जातात, तसंच गुणांचं मूल्यांकन ज्योतीने स्वत:साठी केलं आहे. आणि त्यानंतर तिचे गुण इतर कोणाही पेक्षा जास्त असल्याचा तिचा दावा आहे. ‘खेलरत्न पुरस्कारासाठी ज्या पद्धतीने गुण मोजले जातात ते पाहता माझे इतर कुणाही ॲथलीट पेक्षा जास्त म्हणजे १४८.७४ गुण झाले आहेत. आशियाई क्रीडास्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा यातच माझे ५०च्या वर गुण झाले आहेत,’ ज्योतीने आपली बाजू मांडताना म्हटलं आहे. (Jyothi Surekha Vennam on Khel Ratna Snub)
…तर न्यायालयात जाईन
पुढे जाऊन तिने क्रीडा प्राधिकरणाच्या (Sports Authority) अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला आहे. ‘साईच्या अधिकाऱ्यांकडून मला उत्तर हवं आहे की, त्यांनी पुरस्कार ठरवण्यासाठी कुठले निकष वापरले आणि माझा विचार का झाला नाही. त्यांनी वेळेत उत्तर दिलं नाही तर मी न्यायालयाचा दरवाजा ठोठावेन,’ असं ज्योतीने टाईम्स वृत्तसमुहाशी बोलताना सांगितलं. (Jyothi Surekha Vennam on Khel Ratna Snub)
अर्थात, न्यायालयाचा पर्याय हा शेवटचा असेल असंही तिने म्हटलं आहे. (Jyothi Surekha Vennam on Khel Ratna Snub)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community