पाकिस्तान सीमेवर २५० ते ३०० दहशतवादी लॉन्चपॅडवर असून ते जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोर करण्याचा प्रयत्न करत आहेत. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ( Security Alert)
यावेळी गुप्तचरांच्या हवाल्याने अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी की, याबाबत सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. सीमेपलीकडून घुसखोरीचा कोणताही प्रयत्न केला तरी सैनिकांकडून हाणून पाडला जाईल.
बीएसएफचे आयची अशोक यादव यांनी पुलवामा येथे सांगितले की, दहशतवादी कारवाया पाहता आम्ही (BSF) आणि लष्कर संवेदनशील भागांवर लक्ष ठेवून आहोत आणि सतर्क आहोत. गेल्या काही वर्षांत सुरक्षा दल आणि काश्मीरमधील जनता यांच्यातील बॉन्डिंग वाढले आहे. जनतेने सहकार्य केले, तर विकासाची कामे अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेता येतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community