CISF जवानाची एके ४७ मधून गोळी झाडून आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी कौटुंबिक कारण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

256
CISF जवानाची एके ४७ मधून गोळी झाडून आत्महत्या
CISF जवानाची एके ४७ मधून गोळी झाडून आत्महत्या

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने कर्त्यव्यावर असताना एके ४७ या सर्व्हिस रायफल मधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ गार्डन येथे शनिवारी (१६ डिसेंबर) सकाळी घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी कौटुंबिक कारण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी बीकेसी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे. (CISF)

मुकेश खेतारिया (४०) असे या सीआयएसएफ च्या जवानाचे नाव आहे. मुकेश खेतारिया मूळचा गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यात राहणारा होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात शिपाई या पदावर असणारा मुकेश मुंबईत कर्तव्यावर होता. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जीओ गार्डन या ठिकाणी गेट क्रमांक ५ वर तैनात होता. (CISF)

(हेही वाचा – Mumbai Deep Cleaning Drive : मुंबईत सूक्ष्म पद्धतीच्या स्वच्छता मोहिम; १५ दिवसांतच उचलला १०४२ मेट्रिक टनाचा राडारोडा)

शनिवारी सकाळी ९ वाजता कर्तव्यावर असताना मुकेश याने सुरक्षा रक्षक केबिन मध्ये त्याच्याकडे असलेल्या सर्व्हिस एके ४७ रायफल मधून स्वतःच्या मानेत गोळी झाडली. गोळी झाडल्याचा आवाज होताच जिओ गार्डन परिसरात खळबळ उडाली, चहा पिण्यासाठी गेलेले मुकेशचे सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. व जखमी मुकेशला तत्काळ उपचारासाठी सायन रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. (CISF)

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

या घटनेची माहिती मिळताच बीकेसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळावरून एके ४७ ही सर्व्हिस रायफल ताब्यात घेऊन घटनस्थळाचा पंचनामा करून आत्महत्येची नोंद केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश यांच्याजवळ कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट मिळून न आल्यामुळे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. कोटुंबिक कारणातून मुकेशने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत असून या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबांना देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. (CISF)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.