BJP Mumbai : बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांच्या संयोजिकांच्या नेमणुकीनंतर महिला मोर्चात नाराजी?

मुंबई भाजपने काही दिवसांपूर्वीच बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचे संयोजन प्रा. आरती पुगांवकर यांची नेमणूक केली आहे.

164
BJP Mumbai : बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांच्या संयोजिकांच्या नेमणुकीनंतर महिला मोर्चात नाराजी?
BJP Mumbai : बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांच्या संयोजिकांच्या नेमणुकीनंतर महिला मोर्चात नाराजी?

एका बाजुल भारतीय जनता पक्ष हा पक्षाची संघटनांत्मक ताकद वाढवून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामाची जय्यत तयारीला लागलेले असतानाच या पक्षाच्या महिला मोर्चामध्येच धुसफुस सुरु असल्याची चर्चा खासगीत ऐकायला मिळत आहे. मुंबई भाजप महिला मोर्चा आणि अन्य महिलांसंदर्भातील अभियानासाठी नेमणूक करण्यात आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीवरून ही धुसफूस असून महिला मोर्चातील पदाधिकाऱ्यांनी अन्य महिलांसंदर्भातील अभियानासाठी नेमणूक झालेल्या महिलांना सहकार्य न करण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती मिळत आहे. (BJP Mumbai)

मुंबई भाजपने काही दिवसांपूर्वीच बेटी बचाओ बेटी पढाओ (Beti Bachao, Beti Padhao) या अभियानाचे संयोजन प्रा. आरती पुगांवकर यांची नेमणूक केली आहे. तसेच त्यानंतर सह संयोजक, कार्यकारीणी सदस्य तसेच जिल्हा संयोजकांची नियुक्ती संयोजकांच्या स्वाक्षरी करण्यात आली, मात्र, या बेटी बचाओ बेटी पढाओ (Beti Bachao, Beti Padhao) या अभियानाची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या नावाच्या यादीवर लक्ष टाकल्यास आरती पुगांवकर या माजी नगरसेवक चंद्रकांत पुगांवकर यांची कन्या असून शिक्षण समितीच्या माजी सदस्य होत्या, तर कार्यकारिणी सदस्य फाल्गुनी दवे आणि उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा संयोजक प्रीती सातम याच केवळ माजी नगरसेविका आहेत. तर बाकीचे सर्व चेहरे हे पक्षातील सक्रिय पदाधिकारी असल्या तरी परिचित चेहरे नाहीत. परंतु यासर्व सुरुवातीपासून पक्षाचे काम करत आहेत. त्यामुळे या बेटी बचाओ, बेटी पढाओ (Beti Bachao, Beti Padhao) या अभियानासाठी नेमणूक करण्यात आलेल्या चेहऱ्यांमुळे महिला मोर्चातील महिला पदाधिकाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी पसरल्याचे ऐकायला मिळत आहे. (BJP Mumbai)

(हेही वाचा – Mumbai Deep Cleaning Drive : मुंबईत सूक्ष्म पद्धतीच्या स्वच्छता मोहिम; १५ दिवसांतच उचलला १०४२ मेट्रिक टनाचा राडारोडा)

या अभियानासाठी महिला मोर्चाला विचारात न घेतल्याने तसेच मोर्चातील महिला पदाधिकाऱ्यांवर याची जबाबदारी न टाकल्याने ही नाराजी पसरली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महिला मोर्चाने प्रत्येक जिल्हयातील महिलांना निर्देश देत या अभियानांतील संयोजकांना कोणतेही सहकार्य न करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती मिळत असून यामुळे बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातील महिला संयोजिका आणि महिला मोर्चात दोन उभे गट पडल्याची चर्चा भाजपमध्ये खासगीत ऐकायला मिळत आहे. तसेच प्रत्यक्षात या अभियानाचे काम करणाऱ्या संयोजकांनाही याचा अनुभव येत असल्याने भाजपमध्ये य दोन्ही गटांमधील वादाची चर्चा चांगलीच रंगलेली ऐकायला मिळत आहे. (BJP Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.