Railway Accident :सातारा-कोरेगाव मार्गावर मालगाडीचे दोन डबे घसरले; तीन तास रेल्वे वाहतूक ठप्प

सातारा (satara) ते कोरेगाव (Koregaon) रेल्वे लोहमार्गावर १५२/२ किलोमीटरवर १६ डिसेंबर (शनिवार) सकाळी साडेअकरा वाजता मालगाडीचे (Goods Train)  दोन डब्बे रेल्वे रुळावरून घसरल्याने सुमारे दोन ते तीन तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

266
Railway Accident :सातारा-कोरेगाव मार्गावर मालगाडीचे दोन डबे घसरले; तीन तास रेल्वे वाहतूक ठप्प
Railway Accident :सातारा-कोरेगाव मार्गावर मालगाडीचे दोन डबे घसरले; तीन तास रेल्वे वाहतूक ठप्प

सातारा (satara) ते कोरेगाव (Koregaon) रेल्वे लोहमार्गावर १५२/२ किलोमीटरवर १६ डिसेंबर (शनिवार) सकाळी साडेअकरा वाजता मालगाडीचे (Goods Train)  दोन डब्बे रेल्वे रुळावरून घसरल्याने सुमारे दोन ते तीन तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. डबे घसरण्याचे कारण समजू शकले नाही. मात्र, पुढील चौकशीत ते पुढे येईल असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.तर या मार्गावरील अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलले. शनिवारी रात्री पर्यंत या मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांच्या वेळेवर परिणाम झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.  (Railway Accident)

(हेही वाचा : Mumbai Local: अंधेरीतील गोखले पूल उड्डाणपुलाच्या कामासाठी ‘या’ लोकल रद्द)

रेल्वे ने दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव ते सातारा रेल्वे लोहमार्गदरम्यान शिरढोण -मंगळापूर या गावांच्या मध्यावर १५२/२ किलोमीटरवर मालगाडीचे दोन डबे अचानक रुळावरून खाली उतरले. मात्र प्रसंगावधान राखत रेल्वेच्या चालकाने रेल्वे थांबल्यामुळे अपघात टळला.(Railway Accident )

डबे घसरल्याचे समजताच रेल्वे प्रशासनाने अपघातग्रस्त ट्रॅक बंद ठेवून दुसऱ्या ट्रकने रेल्वे वाहतूक वळवली. तातडीने डबे व रेल्वे ट्रॅक दुरुस्तीसाठी मिरज येथून पथकही मागविण्यात आले. मात्र या दरम्यान चार प्रवासी रेल्वे गाड्या सुमारे दोन ते तीन तास  उशिरा धावल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.तर सुदैवाने आजूबाजूला फारसे कोणी नसल्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.