लुडविग वान बीथोव्हेन एक जर्मन संगीतकार होते. पाश्चात्य कला संगीतातील शास्त्रीय आणि रोमँटिक युगांमधील ते सर्वात प्रसिद्ध संगीतकारांपैकी एक होते. ९ सिम्फनी, ५ पियानो कोन्सर्तो, एक वॉयलिन कंसर्टों, ३२ पियानो सोनटा, १६ स्ट्रिंग क्वार्टेस ही त्यांची कामे प्रचंड गाजली आहेत. बीथोव्हेन यांचा जन्म पवित्र रोमन साम्राज्यातील साल्झबुर्ग येथे १७ डिसेंबर १७७० मध्ये झाला.
बीथोव्हेन यांनी सुमारे ६०० संगीत रचना केल्या आहेत आणि त्यांच्या अनेक रचना आजही लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे त्यांनी लहानपणापासून संगीताचे धडे आपल्या वडिलांकडून जोहान वान बीथोव्हेन यांच्याकडून गिरवले. म्हणून बालपणापासूनच त्यांनी रचना करायला सुरुवात केली होती. वयाच्या २१ व्या वर्षी ते व्हिएन्नामध्ये गेले आणि त्यांनी जोसेफ हेडन यांच्याबरोबर संगीत रचनांचा अभ्यास करायला सुरुवात केली.
(हेही वाचा – Mumbai Local: नव्या वर्षात लोकल प्रवास वेगवान होणार, प्रवाशांचा वेळ वाचण्यासाठी ‘ही’ कामे पूर्ण करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय )
हळूहळू त्यांनी पियानोवादक म्हणून ख्याती प्राप्त केली. त्यांना प्रचंड प्रसिद्धी प्राप्त झाली. मात्र १८१४ मध्ये ते पूर्णपणे बहिरे झाले आणि त्यांनी सामाजिक जीवनातील त्यांचा वावर कमी केला. याचा त्यांच्या कलाकृतीवरदेखील मोठा परिणाम झाला आणि त्यांनी कला सादर करणेदेखील बंद केले. त्यानंतर ते काही वर्षे आजारीच होते आणि अंथरुणाला खिळून होते. १८२७ रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मात्र त्यांची संगीत रचना अमर झाली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community