Explosion In Company: नागपूर-अमरावती रोडवरील कंपनीत स्फोट, ५ जणांचा मृत्यू

बाजारगाव आणि आजूबाजूच्या परिसरात राहणारे कामगार या कंपनीत मोठ्या प्रमाणात कामावर येतात.

163
Explosion In Company: नागपूर-अमरावती रोडवरील कंपनीत स्फोट, ५ जणांचा मृत्यू
Explosion In Company: नागपूर-अमरावती रोडवरील कंपनीत स्फोट, ५ जणांचा मृत्यू

नागपूर-अमरावती रोडवरील बाजारगाव इथल्या एका स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला. सकाळी ९ ते ९.३०च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेत ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नागपूर येथील पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

सोलार एक्सोप्लोझिव्ह असे या कंपनीचे नाव आहे. या कारखान्यात स्फोट झाला त्यावेळी महिला कर्मचारीही उपस्थिती होत्या. बाजारगाव आणि आजूबाजूच्या परिसरात राहणारे कामगार या कंपनीत मोठ्या प्रमाणात कामावर येतात.

हेही पहा – 

या घटनेबाबत नागपूरच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलेली माहिती अशी की, कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामगारांचे नातेवाईक येऊन थांबले आहेत. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे, मात्र अद्याप कामगारांची नावे, किती कामगारांचा मृत्यू झाला आणि किती कामगार जखमी झाले याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आरोग्य विभागाचे पथकही या ठिकाणी दाखल झालेले आहे.

(हेही वाचा – weather Update : दिल्लीत कडाक्याची थंडी, महाराष्ट्रात हलका गारठा तर काही राज्यात पावसाचा इशारा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.