Manodhairya Scheme : लैंगिक अत्याचार झालेल्यांना ‘मनोधैर्य’ चा आधार

पीडित महिला, मुली व बालकांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने ऑक्टोबर २०२३ मध्ये मनोधैर्य ही योजना सुरू केली आहे. महिला,बालकांवर वाईट प्रसंग ओढविल्यास त्यांना शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे योजनेंतर्गत मदत दिली जाते. या योजनेमुळे राज्यभरातील पीडिता तसेच मुलींना मोठा आधार मिळाला आहे.

295
Manodhairya Scheme : लैंगिक अत्याचार झालेल्यांना 'मनोधैर्य' चा आधार
Manodhairya Scheme : लैंगिक अत्याचार झालेल्यांना 'मनोधैर्य' चा आधार

पीडित महिला, मुली व बालकांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने ऑक्टोबर २०२३ मध्ये मनोधैर्य ही योजना सुरू केली आहे. महिला,बालकांवर वाईट प्रसंग ओढविल्यास त्यांना शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे योजनेंतर्गत मदत दिली जाते. या योजनेमुळे राज्यभरातील पीडिता तसेच मुलींना मोठा आधार मिळाला आहे. (Manodhairya Scheme)

या प्रकरणाचा अर्ज कोठे करावा
अशा प्रकरणात एफआयआर नोंद झाल्यानंतर मदतीसाठी प्रस्ताव त्या परिसरातील पोलिस ठाण्यात करण्यात येतो. तो प्रस्ताव त्या पोलिस ठाण्यामार्फतच जिल्हा महिला व बालविकास आधिकारी कार्यालयासह प्राप्त होतात हा प्रस्ताव जिल्हा क्षतीसाहाय्य व पुनर्वसन मंडळाकडे मंजुरीसाठी सादर होतो. (Manodhairya Scheme)

निकष व अटी
महिला किंवा बालकांवर अत्याचार झाल्यानंतर तक्रारीवरून पोलिसात एफआयआर दाखल झाल्यानंतर मदत देता यावी म्हणून मंडळाची बैठक बोलावून मदत मंजूर होते. पीडित महिला,बालकासह जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्फत वैद्यकीय सेवा पुरविली जाते. (Manodhairya Scheme)

(हेही वाचा :Raste vikas App : ग्रामीण भागातील रस्ते दाखवणारे नवीन ॲप येणार; ठाणे जिल्हा परिषदेचा उपक्रम)

 
योजनेचे स्वरूप
बलात्कार,बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी किमान दोन लाख व विशेष प्रकरणामध्ये ३ लाख अर्थसाहाय्य अनुज्ञेय आहे.अॅसिड हल्ल्यात महिलांना ५० हजार इतके अर्थसाहाय्य देण्याची तरतूद आहे. तसेच यात कायमचे अपंगत्व आल्यास किंवा चेहरा विद्रूप झाल्यासही मदत दिली जाते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.