सिरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्डच्या नव्या किंमती जाहीर केल्यानंतर, आता भारत बायोटेकनेसुद्धा कोवॅक्सिनसाठीच्या नव्या किंमती जाहीर केल्या आहेत. राज्य सरकार आणि खाजगी रुग्णालयांसाठी वेगवेगळ्या किंमती भारत बायोटेककडून जाहीर करण्यात आल्या आहेत.
काय आहेत किंमती?
भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारसाठी एका डोसची किंमत ही 600 रुपये आणि खाजगी रुग्णालयांसाठी 1200 रुपये, अशा कोवॅक्सिनच्या नव्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच निर्यात करण्यात येणार लसीसांठी एका डोसची किंमत 15 ते 20$ इतकी असणार आहे. भारत बायोटेकने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
Bharat Biotech – COVAXIN® Announcement pic.twitter.com/cKvmFPfKlr
— Bharat Biotech (@BharatBiotech) April 24, 2021
म्हणून नव्या किंमती जाहीर
1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आली. त्यामुळे निर्माण होणारी लसींची वाढती गरज आणि मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने, लस खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. लस निर्मिती करणा-या कपन्यांना सरकार आणि खाजगी रुग्णालयांसाठी 1 मे पूर्वी किंमती जाहीर करण्यास सांगण्यात आले होते. या कंपन्यांना त्यांच्या एकूण लस उत्पादनापैकी 50 टक्के लस पुरवठा हा केंद्र सरकारला आणि 50 टक्के लस पुरवठा हा राज्य सरकारे आणि खाजगी रुग्णालयांना करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, सिरम आणि भारत बायोटेकने लसींच्या किंमती जाहीर केल्या आहेत.
(हेही वाचाः 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना घेता येणार लस… केंद्र सरकारचा मोठा निर्णय!)
काय आहे केंद्र सराकरचा निर्णय?
- लस उत्पादन करणा-या कंपन्यांनी तयार केलेल्या लसीच्या 50 टक्के लसींचा पुरवठा सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीला(केंद्र सरकारला) देणे बंधनकारक आहे. तर इतर 50 टक्के पुरवठा राज्य सरकार व खुल्या बाजारात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- लस उत्पादकांना राज्य सरकार व खुल्या बाजारातील लसींची किंमत ही 1 मे 2021 पूर्वी जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- या ठरवलेल्या किंमतींच्या आधारे राज्य सरकार व खाजगी रुग्णालये इत्यादिंनी लस विकत घ्यायची आहे.
- आधीप्रमाणेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सना मोफत लस देण्यात येईल.
- 45 वर्षांवरील वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण सुद्धा चालू राहील.
- एक डोस घेऊन झालेल्या सर्व कर्मचारी तसेच 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना दुस-या डोससाठी प्राधान्य देण्यात येईल.
- भारत सरकारकडून राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांना पुरवण्यात येणारा लसींचा साठा हा त्या राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येप्रमाणे असेल.
- राज्य प्रशासनामार्फत लसीकरणाचा वेग कमी असल्यास त्या राज्यांना जास्त पुरवठा केला जाणार नाही.
काय आहेत कोविशिल्डच्या किंमती?
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या कोविशिल्ड या लसीसाठी नव्या किंती जाहीर केल्या आहेत. राज्य सरकारसाठी कोविशिल्डच्या एका डोसची किंमत ही 400 रुपये, तर खाजगी रुग्णालयांसाठी एका डोसची किंमत ही 600 रुपये इतकी असणार आहे. मुख्य म्हणजे इतर सर्व परदेशी लसींच्या तुलनेत कोविशिल्डची किंमत सर्वात कमी आहे.
IMPORTANT ANNOUNCEMENT pic.twitter.com/bTsMs8AKth
— SerumInstituteIndia (@SerumInstIndia) April 21, 2021
(हेही वाचाः सीरमच्या लसीची किंमत वाढली, २५० वरून ६०० झाली! )
सिरमने ट्वीट करत आपल्या किंमतींबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सिरमकडून राज्य सराकरला देण्यात येणार असणा-या एका डोसची किंमत, ही खुल्या बाजारातील किंमतींपेक्षा एक तृतीयांश इतकी आहे.
We at @SerumInstIndia have for the past five decades been at the forefront of supplying vaccines and saving lives globally. We care about and respect every human life and strongly believe in transparency, and thus we hope our statement below can clear any confusions. pic.twitter.com/YQ3x38BuFL
— SerumInstituteIndia (@SerumInstIndia) April 24, 2021
महाराष्ट्राला होणार लसींचा जलद पुरवठा
सिरम इन्स्टिट्यूटकडून महाराष्ट्राला लसींचा जलद पुरवठा करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. लवकरात लवकर सिरमकडून महाराष्ट्राला लस पुरवठा केला जोईल, असे आश्वासन सिरमचे संचालक अदर पुनावाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. तसेच सिरमसारख्या जागतिक स्तारावरील संस्था महाराष्ट्रात असल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
We are proud to have a world-class institution like Serum Institute of India in our state and we look forward to a strategic partnership for the safety of our citizens from COVID-19.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 24, 2021
(हेही वाचाः अखेर केंद्र आले धावून! रेमडेसिवीरचा राज्याला जादा पुरवठा! )
Join Our WhatsApp Community