Encounter With Naxalites: छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, सीआरपीएफचे अधिकारी हुतात्मा

जिल्हा पोलीस दलाकडून नक्षलवाद्यांचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात येत आहेत.

147
Encounter With Naxalites: छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, सीआरपीएफचे अधिकारी हुतात्मा
Encounter With Naxalites: छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, सीआरपीएफचे अधिकारी हुतात्मा

छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)  (Encounter With Naxalites) एक अधिकारी हुतात्मा झाला असून एक कॉन्स्टेबल जखमी झाला आहे.

जखमी कॉन्स्टेबलला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘एएनआय’कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार, सीआरपीएफच्या १६५व्या बटालियनचे एक पथक रविवारी सकाळी नक्षलवादविरोधी मोहिमेवर निघाले होते. त्यावेळी जरगुंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी हल्ला केला. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनी प्रत्युत्तर दिले.

(हेही वाचा – Stock Market: शेअर बाजारात ‘या’ आयपीओचा प्रवेश, रक्कम दुप्पट; गुंतवणूकदार खूश )

१६५व्या बटालियनचे सबइन्स्पेक्टर हुतात्मा…
या हल्ल्यादरम्यान सीआरपीएफच्या १६५व्या बटालियनचे सबइन्स्पेक्टर सुधाकर रेड्डी हे हुतात्मा झाले, तर पोलीस कॉन्स्टेबल रामू जखमी झाले आहेत. जखमी कॉन्स्टेबल रामू यांच्यावर यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांना पुढील उपचारासाठी एअरलिफ्ट करण्यात येत आहे. या घटनेबाबत संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीआरपीएफ, कोब्रो पथक आणि जिल्हा पोलीस दलाकडून आजूबाजूच्या परिसरात नक्षलवाद्यांचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस दलाकडून देण्यात आली आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.