दिल्ली मेट्रोमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या मृत्यूचं कारणदेखील एकदम धक्कादायक आहे. तर हा मृत्यू मेट्रोच्या दरवाजामध्ये साडी आणि जॅकेट अडकल्यानंतर मेट्रोचे दरवाजे बंद झाले आणि मृत महिला काही मीटर अंतरावर फरफटत गेली. आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. (Metro Accident)
दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, १४ डिसेंबर रोजी इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर महिलेच्या मृत्यूची घटना घडली. रीना देवी असे या महिलेचे नाव आहे.सदर महिला आपल्या मुलासोबत नागलोई ते मोहन नगर प्रवास करत होती. (Metro Accident)
या घटनेनंतर प्राथमिक तपासामध्ये धक्कादायक कारण समोर आलेलं आहे. मेट्रोच्या दरवाजामध्ये महिलेची साडी अडकली, तरीही दरवाजाचे सेन्सर अॅक्टिवेट झाले नाहीत. त्यामुळे दरवाजे बंद झाले आणि मेट्रो धावू लागली. महिला काही मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली अन रेल्वे ट्रॅकवर पडली. अपघातानंतर महिलेला तातडीने सफदरजंग हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होत तर त्यामध्ये त्या जबर जखमी झाली की उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community