Brad Pitt : अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माता ब्रॅड पिट

221
Brad Pitt : अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माता ब्रॅड पिट
Brad Pitt : अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माता ब्रॅड पिट

विल्यम ब्रॅडली ‘ब्रॅड’ पिट (Brad Pitt) हा एक अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. त्याला जगातील सर्वात आकर्षक पुरुष म्हणून मान मिळाला आहे. ब्रॅड पिटला दोन अकादमी पुरस्कार नामांकने आणि चार गोल्डन ग्लोब पुरस्कार नामांकन मिळाले आहेत आणि एक पुरस्कार त्याने जिंकला आहे.

१९९१ मध्ये थेल्मा अँड लुईस चित्रपटातील भूमिकेमुळे अभिनेता म्हणून मान्यता

ब्रॅड पिटचा (Brad Pitt) जन्म १८ डिसेंबर १९६३ रोजी शॉनी यूएस येथे झाला. त्याच्या आईचे नाव जेन एट्टा होते, ती एक हायस्कूल सल्लागार होती आणि ट्रक कंपनीचे मालक होते, त्यांचे विल्यम अल्विन पिट. त्याचे कुटुंब परंपरावादी बाप्टिस्ट होते. ब्रॅड पिटने १९८७ मध्ये सीबीएस मालिका “डल्लास” मध्ये भूमिका साकारुन आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. १९९१ मध्ये थेल्मा अँड लुईस या चित्रपटातील भूमिकेमुळे त्याला अभिनेता म्हणून मान्यता मिळाली.

(हेही वाचा-Article 370 : देशाला लागलेला कलम ३७० रूपी कर्करोग काढून टाकणे आवश्यकच होते !)

गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि अकादमी पुरस्कार नामांकन

ए रिव्हर रन्स थ्रू इट आणि इंटरव्ह्यू विथ द व्हॅम्पायर या बिग-बजेट चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केल्या. १९९४ मध्ये ऑफ द फॉलसाठी गोल्डन ग्लोब नामांकन मिळाला. १९९५ मध्ये त्याने क्राईम थ्रिलर सेव्हन आणि ट्वेल्व मंकीज या विज्ञानकथा चित्रपटात काम केले आणि समीक्षकांची वाहवा मिळवली. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि अकादमी पुरस्कार नामांकन मिळाले. त्यानंतर फाइट क्लब, ओशन्स इलेव्हेन आणि ओशन ट्वेल्थ हे त्याचे चित्रपट खूपच यशस्वी ठरले. ट्रॉय आणि मि ऍंड मिसेस स्मिथ (Brad Pitt) या त्याच्या चित्रपटांनी खूप गल्ला कमावला. द क्यूरिअस केस ऑफ़ बेंजामिन बटन या चित्रपटात त्याने अफलातून भूमिका केली. आजही तो अनेक चित्रपटांमध्ये काम करतोय आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.