ऋजुता लुकतुके
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने (Ind vs SA Test Series) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. कौटुंबिक कारणामुळे भारतात परतण्याची परवानगी त्याने मागितली होती. बीसीसीआयने ती मंजूर केली आहे. बीसीसीआयनेच आज अधिकृत पत्रक काढून मीडियाला ही माहिती दिली. ईशानच्या जागी बदली खेळाडू म्हणून कोना भारतचा समावेश करण्यात आला आहे.
कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. आणि कोना भारत भारतीय ए संघाचा कर्णधार म्हणून सध्या आफ्रिकेतच आहे. तो आता भारतीय संघात दाखल होईल.
🚨 UPDATE 🚨: Ishan Kishan withdrawn from #TeamIndia’s Test squad. KS Bharat named as replacement. #SAvIND
Details 🔽https://t.co/KqldTEeD0T
— BCCI (@BCCI) December 17, 2023
या पत्रकात बीसीसीआयने वैयक्तिक कारण असं म्हटलं आहे. पण, नेमकं कारण स्पष्ट केलेलं नाही. शनिवारी दीपक चहर आणि महम्मद शामी कसोटी मालिका खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. आता ईशान किशननेही माघार घेतली आहे.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दोन कसोटी सामने (Ind vs SA Test Series) खेळणार असून पहिली कसोटी २६ ते ३० डिसेंबर दरम्यान सेंच्युरियनला होईल. तर दुसरा कसोटी सामना केपटाऊनला ३ ते ७ जानेवारी दरम्यान होणार आहे.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहीत शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, ऋतुराज गायकवाड, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, महम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमरा, प्रसिध कृष्णा व के भारत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community