इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Italy PM) यांनी इस्लामी मूल्यांबाबत मोठे विधान केले आहे. युरोपमध्ये इस्लामला स्थान नाही, असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा आहे.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी म्हटले आहे की, इस्लामी संस्कृती आणि युरोपियन संस्कृती विसंगत आहेत. युरोपमध्ये इस्लामला स्थान नाही. यापूर्वी ही त्यांनी इस्लामी मूल्यांची खिल्ली उडवली आहे. ते शरियाचे पालन करणारे लोक आहेत. त्यांचा युरोपियन संस्कृतीशी काहीही संबंध नाही. अशा परिस्थितीत ज्यांना इस्लामीकरण हवे आहे त्यांनी युरोपपासून दूर राहिले पाहिजे. त्यांनी युरोपमध्ये राहण्याची गरज नाही.
(हेही पहा –Mumbai pollution: मुंबईमध्ये प्रदूषणात वाढ, वाहतूक पोलिसांकडून ५३ हजारांपेक्षा जास्त वाहनांवर ई-चलन जारी )
पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांच्या अलीकडील इटली दौऱ्यादरम्यान, बेकायदेशीर स्थलांतरितांची वाढती संख्या युरोपियन समाजाला अस्थिर करेल ,असे म्हटले आहे. अशा परिस्थितीत आपल्याला आपले कायदे अद्ययावत करण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी करण्याची गरज आहे. जेणेकरून बेकायदेशीर स्थलांतरितांची आणि युरोपवर परिणाम करणारी समस्या टाळता येईल. सुनक यांच्या या विधानाला उत्तर देताना पंतप्रधान जॉर्जिया यांनी इस्लाम आणि युरोपमध्ये येणाऱ्या मुस्लिमांबद्दल हे महत्त्वाचे विधान केले आहे.
दोन्ही मूल्य परस्परविरोधी…
मेलोनी पुढे म्हणाल्या की, इटलीतील इस्लामची सांस्कृतिक केंद्रे, जिथे शरिया कायदा लागू आहे, त्यांना सौदी अरेबियाकडून निधी दिला जात आहे. युरोपमध्ये जी इस्लामीकरणाची प्रक्रिया सुरू आहे, ती आपल्या संस्कृतीच्या मूल्यांपासून खूप दूर आहे. अशा परिस्थितीत मुस्लिमांनी युरोपपासून दूर राहिले पाहिजे. आपल्या संस्कृतीची मूल्ये आणि इस्लामी मूल्ये दोन्ही परस्परविरोधी आहेत, त्यामुळे इस्लामी इस्लामी संस्कृतीचे पालन करणाऱ्यांनी युरोपपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
जॉर्जियांचे विधान चर्चेत…
जॉर्जिया मेलोनी यांनी अलीकडेच दुबईत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या कट्टर उजव्या विचारसरणीच्या ब्रदर्ज ऑफ इटली पक्षाच्या नेत्या आहेत. इटलीच्या पहिल्या पंतप्रधान होण्याबरोबरच वयाच्या ३१व्या वर्षी इटलीच्या सर्वात तरुण मंत्री होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. जॉर्जिया अनेकदा तिच्या विधानांमुळे आणि उजव्या विचारसरणीच्या प्रवृत्तीमुळे चर्चेत राहिल्या आहेत. जॉर्जियाने स्वतःला मुसोलिनीचा वारस म्हटले होते, त्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. जॉर्जिया यांनी एका निवेदनात मुस्लिमांचा इटलीला धोका असल्याचेही म्हटले आहे.
हेही पहा –