Geert Wilders: हिंदूंना माझा नेहमीच पाठिंबा, नेदरलँड्चे नेता गीर्ट वाइल्डर्स यांचे महत्त्वपूर्ण विधान 

१९६३ मध्ये जन्मलेल्या वाइल्डर्स यांनी पी. व्ही. व्ही. ची स्थापना केली.

206
Geert Wilders: हिंदूंना माझा नेहमीच पाठिंबा, नेदरलँड्चे नेता गीर्ट वाइल्डर्स यांचे महत्त्वपूर्ण विधान 
Geert Wilders: हिंदूंना माझा नेहमीच पाठिंबा, नेदरलँड्चे नेता गीर्ट वाइल्डर्स यांचे महत्त्वपूर्ण विधान 

नेदरलँड्सच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवणारे गीर्ट वाइल्डर्स (Geert Wilders) पुन्हा एकदा हिंदूंच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. या विजयानंतर त्यांनी विशेषतः भारताचे आभार मानले आहेत. गेल्या महिन्याच्या निवडणुकीत, वाइल्डर्सच्या पी. व्ही. व्ही. (पार्टी फॉर फ्रीडम) या पक्षाने विजय मिळवला. सध्या युतीबाबत चर्चा सुरू आहे.

“डच निवडणुका जिंकल्याबद्दल माझे आभार मानणाऱ्या जगभरातील माझ्या मित्रांचे मी आभार मानतो”, असे वाइल्डर्स यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट केले आहे. भारतातून अनेक संदेश येत आहेत. केवळ हिंदू असल्याकारणाने बांगलादेश, पाकिस्तानमध्ये ज्यांच्यावर हल्ले होतात किंवा धमक्या दिल्या जातात अशा हिंदूंना मी नेहमीच पाठिंबा देईन.’ असेही त्यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.

(हेही वाचा – Valu : मराठी चित्रपटांना जागतिक गौरव मिळवून देणारा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘वळू’ अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी! )

नुपूर शर्मा यांचेही समर्थन…
२०२२ मध्ये, वाइल्डर्सने भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचेही समर्थन केले. त्यानंतर शर्मा पैगंबर महंमद यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे वादात अडकल्या होत्या. “तुष्टीकरण कधीच काम करत नाही”, असे ते म्हणाले. आणि त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडत जाते. भारतातील माझ्या प्रिय मित्रांनो, इस्लामी देशांना घाबरू नका. स्वातंत्र्यासाठी उभे राहा आणि तुमच्या राजकारणी नुपूर शर्माचे समर्थन करा.’ जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० कलम रद्द करण्यावरही वाइल्डर्स यांनी भारत सरकारला पाठिंबा दिला होता. “भारत ही संपूर्ण लोकशाही आहे. पाकिस्तान १०० टक्के दहशतवादी देश आहे. या प्रकरणात, निवड खूप सोपे आहे.’

गीर्ट वाइल्डर्स कोण आहेत?
१९६३ मध्ये जन्मलेल्या वाइल्डर्स यांनी पी. व्ही. व्ही. ची स्थापना केली. पी. व्ही. व्ही. हा नेदरलँड्समधील तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. त्याला अनेकदा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची डच आवृत्ती म्हटले जाते. अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतरही ते सुरक्षित आहेत. ते नेदरलँड्सचे पहिले उजव्या विचारसरणीचे पंतप्रधान आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.