दाऊदवर झालेल्या विषप्रयोगाच्या वृत्ताबाबत १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोटाचा खटला हाताळणारे प्रसिद्ध वकील आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातला प्रमुख आरोपी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमवर कराचीमध्ये अज्ञात व्यक्तींनी विषप्रयोग केल्याची बातमी आली. त्याच्यावर कराची येथील रुग्णालयात उपचार सुरू झाले आणि तो मेला ही बातमी पाकिस्तान ‘कन्फर्म’ करूच शकत नाही, कारण दाऊद पाकिस्तानमध्ये असल्याचे ‘सत्य’ त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी कायमच नाकारले. आता जर भारतीयांनी पाकिस्तानात येऊन दाऊदवर विष प्रयोग केल्याचे आरोप केले, तर पाकिस्तानचे राज्यकर्तेच सगळ्या जगासमोर उघडे पडतील, असो टोला उज्ज्वल निकम यांनी लगावला आहे.
(हेही वाचा – Joe Biden Security Lapse : राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्याला एका अज्ञात कारची धडक )
पाकिस्तानची अळीमिळी गुपचिळी…
इंटरनेट बंद करून पाकिस्तान या बातमीवर अळीमिळी गुपचिळी करून बसला असून भारताच्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर असणारा दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये नसल्याचाच जप पाकिस्तान सरकार, लष्कर करत राहिले. त्यामुळेच आता पाकिस्तानची सगळ्या जगात गोची होत आहे, या मुद्द्यावर उज्ज्वल निकम यांनी बोट ठेवले आहे.
बातमी चालवली, पण इंटरनेट सेवा बंद
उज्ज्वल निकम पुढे म्हणाले की, पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांनी दाऊदच्या विष प्रयोगाची बातमी चालवली, मात्र पाकिस्तान इंटरनेट सेवा बंद केली आहे. भारतात असे कधीच घडत नाही. पाकिस्तानमध्ये सध्या कोणतेही यादवी युद्ध चालू नाही. अमेरिकेनेही त्यासंदर्भात असा कोणताही खुलासा केला नाही.
पाकिस्तानची गोची…
दाऊदवरील विष प्रयोगामुळे पाकिस्तानचीच पंचाईत झाली आहे, कारण आतापर्यंत पाकिस्तानकडून परवेज मुशर्रफ यांच्यासह सगळ्यांनीच मोठा दावा केला होता की, दाऊद इब्राहिम आमच्याकडे राहात नाही. दाऊद मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटात वॉंटेड गुन्हेगार आहे. मी हा खटला चालवला, तेव्हा दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने कसा कट रचला, याचा पुरावा आम्ही न्यायालयात आरोपींची साक्ष घेऊन सादर केला. त्यामुळे आपले पितळ उघडे पडू नये म्हणून दाऊदला लपवण्यासाठी पाकिस्तान हे प्रयत्न करत आहे. पाकिस्तानची खरी गोची इथेच झाली आहे. पाकिस्तान दाऊदवर भारताने विषप्रयोग केला, असा आता आरोप करूच शकत नाही. कारण दाऊद पाकिस्तानच्या भूमीत नाही. ही अधिकृत भूमिका पाकिस्तानने घेतली होती.
हेही पहा –