Valu : मराठी चित्रपटांना जागतिक गौरव मिळवून देणारा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘वळू’ अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी!

अतुल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, नंदू माधव, अमृता सुभाष, वीणा जामकर, सतीश तारे, चंद्रकांत गोखले आणि निर्मिती सावंत यांच्या अफलातून भूमिका!

211
Valu : मराठी चित्रपटांना जागतिक गौरव मिळवून देणारा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'वळू' अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी!
Valu : मराठी चित्रपटांना जागतिक गौरव मिळवून देणारा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'वळू' अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी!

महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय कथा आणि कथेतील मजेदार पात्र असणारा चित्रपट ‘वळू’ (Valu) आता २२ डिसेंबर २०२३ पासून ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘उमेश कुलकर्णी’ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ‘रोटरडॅम’, आशियाई, वॉर्सा, कार्लोवी वेरी, रेकजाविक -आइसलँड, ला रोशेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सह पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २००८ मध्ये ‘वळू’ चित्रपटास सर्वोत्तम दिग्दर्शन आणि सर्वोत्तम छायांकन असे पुरस्कार मिळाले आहेत.

(हेही वाचा-Joe Biden Security Lapse : राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्याला एका अज्ञात कारची धडक)

कुसवडे गावात वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेनुसार गावकऱ्यांनी देवाला वाहिलेला ‘डुरक्या’ नावाचा वळू (Valu) गावात धुमाकूळ घालतो. तेव्हा डुरक्याला पकडण्यासाठी गावातले सरपंच (डॉ. मोहन आगाशे) फॉरेस्ट ऑफिसर स्वानंद गड्डमवारांना (अतुल कुलकर्णी) बोलावतात. डुरक्याला पकडण्याच्या या धुमाकुळात गावात काय काय धमाल घडते हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटातील प्रमुख कलाकार अतुल कुलकर्णी, मोहन आगाशे, भारती आचरेकर, गिरीश कुलकर्णी, वीणा जामकर, दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावंत, नंदू माधव, रेणुका दफ्तरदार, मंगेश सातपुते, अमृता सुभाष, सतीश तारे, चंद्रकांत गोखले, ज्योती सुभाष, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी आहेत. प्रख्यात छायाचित्रकार सुधीर पलसाने यांनी ‘वळू’चा ७० एमएम कॅनव्हास चित्रित केला असून कलादिग्दर्शन रणजित देसाई यांचे तर अत्यंत आकर्षक पार्श्व संगीत मंगेश धाकडे यांनी दिले आहे.

“मराठी चित्रपटांचा चेहरा बदलणारा आणि अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अल्ट्रा झकासच्या माध्यमातून सादर करताना एक वेगळा उत्साह असून ओटीटीवर चित्रपटास नक्कीच भरभरून प्रतिसाद येईल अशी अपेक्षा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.