- सुजित महामुलकर
राज्यातील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळांचे सकाळचे सत्र ९ वाजल्यानंतरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सोमवारी (१८ डिसेंबर) दिले. तसेच शाळेची वेळ येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून बदलण्यात येईल, असेही केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. (Pre-Primary Primary School Timing)
राज्यपालांची सूचना
काही दिवसांपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी सकाळचे शाळांचे सत्र उशिरा सुरू करावे, असे मत व्यक्त केले होते. याचे कारण देताना बैस म्हणाले होते की, मुलांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने सध्याची सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ ही सात ऐवजी ९ पर्यंत पुढे ढकलल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांचे शिक्षणात लक्ष लागेल तसेच सकाळची पालकांची धावपळही कमी होईल. (Pre-Primary Primary School Timing)
मेंदूची वाढ खुंटते
याबाबत विचारले असता शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले की, “लहान मुलांची झोप पूर्ण होत नसल्याने त्यांच्या मेंदूमध्ये सिक्रेशन असते त्याच्यावर परिणाम होतो आणि मुलांच्या मेंदूची वाढ खुंटते. हा विषय आमच्या विचाराधीन होताच, त्यामुळे पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेची वेळ कोणत्याही परिस्थितीत नऊच्या आधी असू नये असे, आमचे मत आहे.” (Pre-Primary Primary School Timing)
(हेही वाचा – Valu : मराठी चित्रपटांना जागतिक गौरव मिळवून देणारा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘वळू’ अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी!)
तज्ञांची समिती स्थापन
“पण हा निर्णय मी एकट्याने घेणे योग्य नाही म्हणून आम्ही एक समिती स्थापन केली आहे. त्यात मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ञ यांचा समावेश असून याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. याबाबतचा निर्णय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल,” असे सांगून केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पुढे सांगितले की असे कारण शासनाकडून शैक्षणिक धोरण तयार करण्याच्या विचारात आहे. (Pre-Primary Primary School Timing)
शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की हा निर्णय नर्सरी (nursery), ज्युनियर केजी (junior KG), सिनीअर केजी (senior KG), इयत्ता पहिली आणि दुसरी यांच्यासाठी लागू असेल. आणि हा निर्णय शासकिय तसेच खाजगी शाळांना लागू असेल. (Pre-Primary Primary School Timing)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community