संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याचा आरोप असलेल्या लखनऊच्या (Parliament Security) सागर शर्माची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी, १७ डिसेंबरला दिल्लीहून आलेल्या स्पेशल सेल टीमने सागर शर्माचा त्याच्या कुटुंबियांशी व्हिडियो कॉलवरून संवाद घडवून आणला. हा संवाद ४० मिनिटे चालला. यादरम्यान सागरने कुटुंबियांना सांगितले की, आपणे जे काही केले ते योग्यच केले.
सागर या व्हिडियो कॉलवर म्हणाला – आई, घरी सर्व ठीक आहे का, काही अडचण आहे का?
त्यावर आई म्हणाली – तू काय केलंस?
सागर – आई, मी जे काही केलं आहे ते बरोबर आहे. ते योग्य केलं. मी ते कोणाच्या सांगण्यावरून केलेलं नाही. चौकशीनंतर मला लवकरच सोडलं जाईल.
त्यानंतर सागर आईला म्हणाला – आई, तुझी आणि माही (बहीण)ची काळजी घे.
सागरने आईसोबत केलेल्या या संवादादरम्यान लखनऊ आणि इतर काही ठिकाणच्या त्याच्या घराबाबत महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती दिली. ज्यांना पोलिसांनी सोबत नेले आहे. दिल्लीतील स्पेशल सेल टिमला सागरच्या खोलीतून ४ बँक खात्यांचे पासबुक सापडले. या व्यवहाराची चौकशी सुरू आहे.
या खात्यांमध्ये कधी, कुठे आणि किती पैशांची देवाणघेवाण झाली, याची माहिती गोळा केली जात आहे. याशिवाय खोलीत पॉकेट डायरी, पुस्तके, फाइल्स, तिकिटे इत्यादी साहित्य सापडले आहे.
सागरच्या वडिलांच्या स्वाक्षरीनंतर ते जप्त करण्यात आले आहेत. तापस यंत्रणेकडून आरोपी सागर शर्माचे आई-वडील आणि बहिणीला एकत्र बसवून चौकशी केली. याआधी यूपी एटीएसने सागरच्या कुटुंबियांचीही चौकशी केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community