- ऋजुता लुकतुके
२०११ मध्ये पदार्पणात पहिल्या चेंडूवर बळी घेण्याचा विक्रमही नॅथन लिऑनच्या नावावर आहे.
२०११ मध्ये श्रीलंकेत कुमार संगकाराचा घेतलेला बळी हा ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लिऑनचा पहिला कसोटी बळी होता. आणि तिथून पुढे संघातील मुख्य फिरकी गोलंदाज होण्यापासून ते दहा वर्षं फिरकीची धुरा वाहत सुरू असलेला त्याचा प्रवास आता पाचशे कसोटी बळींपर्यत येऊन ठेपला आहे. विशेष म्हणजे ही मजल त्याने मारली ती लोकांच्या फारसं नजरेत न भरता.
जागतिक क्रिकेटमधले आघाडीचे फिरकी गोलंदाज कुठले म्हटलं तर अश्विन, आदिल रशिद यांची नावं झटकन डोळ्यासमोर येतील. काहीजण अगदी अफगाणिस्तानच्या रशिद खानचं नावही घेतील. पण, लिऑन फारसा कुणाला आठवणार नाही. पण, तो आपल्या कर्तव्याला चुकलेला नाही, हे कामगिरीवरून कळतंच आहे.
(हेही वाचा – Ujjwal Nikam: दाऊदच्या विषप्रयोगामुळे पाकिस्तानचे पितळ उघडे, उज्ज्वल निकम यांचा टोला)
पाचशेचा टप्पा गाठण्यासाठी ४ बळी
पाचशे बळींचा टप्पा घेणारा तो फक्त आठवा गोलंदाज आहे. यावर्षी ॲशेसनंतर दुखापतीमुळे तो क्रिकेटपासून दूर होता. विश्वचषकातही तो खेळला नाही. पण, पाकिस्तान विरुद्ध त्याने संघात पुनरागमन केलं तेव्हा त्याला पाचशेचा टप्पा गाठण्यासाठी ४ बळी हवे होते. पाकिस्तानचा संघ अख्ख्या कसोटीत चाचपडतच होता. पहिल्या डावात लिऑनला चार बळी मिळाले.
आणि कसोटीच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानचा दुसरा डाव सुरू असताना लिऑनला संधी मिळाली. फहीम अश्रफ त्याचा पाचशेवा बळी ठरला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी लिऑनच्या भोवती कोंडाळं केलं तेव्हा त्याला समजलं काय झालंय. कारण, एरवी भावनारितेकाने त्याचं मन बोथट झालं होतं.
Nathan Lyon becomes only the 8th player to 500 Test wickets 👏 🇦🇺 pic.twitter.com/BN8qeOLbiY
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 17, 2023
पॅट कमिन्सनेही केलं लिऑनचं कौतुक
शिवाय ऑस्ट्रेलियन संघाने ही कसोटीही ३६० धावांनी जिंकली. त्यामुळे लिऑनचा आनंद द्विगुणित झाला. पाचशेचा टप्पा गाठल्याबद्दल मात्र त्याला विश्वास बसत नव्हता.
‘मी अजूनही मला चिमटा काढून बघतो, हे खरं आहे का, असं विचारतो. ज्या यादीत माझं नाव जोडलं गेलं ती यादी खूप मोठी आहे. तिथं मी आहे यावर विश्वासच बसत नाही,’ असं लिऑन विनयाने म्हणतो. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनेही लिऑनचं कौतुक केलं आहे. ‘कसोटीत ५०० बळी ही कामगिरी अजोड आहे. ती फारशी कुणाला जमत नाही. लिऑनने सगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्यांवर बळी मिळवले आहेत,’ असं कमिन्स सामन्यानंतर म्हणाला.
(हेही वाचा – Dawood Ibrahim : दाऊदच्या वृत्ताने गुन्हेगारी विश्वात खळबळ, दाऊदचे मुंबईतील नातलग मात्र चिडीचूप)
पहिल्या पाच गोलंदाजांनी मिळवले सहाशे बळी
३६ वर्षीय लिऑन सर्वाधिक यशस्वी गोलंदाजांच्या यादीत आता आठवा आहे. या यादीत सगळ्यात पुढे आहे मुथय्या मुरलीधरन. त्याच्या नावावर ८०० बळी आहेत. तर ऑस्ट्रेलियाचाच लेगस्पिनर शेन वॉर्न ७९८ बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा जिमी अँडरसन तिसऱ्या, अनिल कुंबळे चौथ्या तर अँड्र्यू फ्लिंटॉफ पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या पाच गोलंदाजांनी सहाशे बळी मिळवले आहेत.
त्यानंतर आहेत ग्लेन मॅग्रा, कर्टने वॉल्श, नॅथन लिऑन, रवी अश्विन, डेल स्टेन आणि कपिल देव.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community