- ऋजुता लुकतुके
विजयासाठी फक्त ८७ धावा हव्या असताना, ६ गडी शिल्लक असताना राजस्थानच्या हातून मोक्याच्या क्षणी सामना निसटला.
राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिअमवर दुसऱ्या डावात राजस्थानला आणखी ८७ धावा हव्या होत्या. अभिजीत तोमर १२९ चेंडूंत १०६ आणि कुणाल सिंग तोमर ६५ चेंडूत ७९ धावा करून खेळत होते. राजस्थान विजय हजारे करंडक पहिल्यांदा पटकावणार हे अटळ दिसत असतानाच जुन्या चेंडूवर अनुभवी हर्षल पटेल गोलंदाजीसाठी आला.
आणि तिथे सामन्याचं चित्रच पालटलं. तोमर आणि कुणाल सिंग या दोघांना हर्षल पटेलनेच बाद केलं. नंतर त्याने अजय कुकनालाही बाद केलं. आणि तिथून मग राजस्थानला सामन्यात परत येताच आलं नाही. राहुल चहरच्या सातव्या क्रमांकावर येऊन १८ धावा सोडल्या तर इतर फलंदाज हजेरी लावून परतले. आणि शेवटी राजस्थानला ३० धावा कमी पडल्या.
(हेही वाचा – Geert Wilders: हिंदूंना माझा नेहमीच पाठिंबा, नेदरलँड्चे नेता गीर्ट वाइल्डर्स यांचे महत्त्वपूर्ण विधान )
हरयाणाने विजय हजारे करंडक आपल्या नावावर केला. हर्षल पटेल बरोबरच सुमित कुमारची गोलंदाजीही प्रभावी ठरली. त्याने ३४ धावांत ३ बळी मिळवले.
𝐂.𝐇.𝐀.𝐌.𝐏.𝐈.𝐎.𝐍.𝐒! 🏆
Say hello 👋 to the winners of the #VijayHazareTrophy 👉 Haryana 🙌🙌@IDFCFIRSTBank | #Final pic.twitter.com/N20IS3quTC
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 16, 2023
अभिजीत तोमरचं शतक वाया गेलं. तर हरयाणाने पहिली फलंदाजी करत २८७ धावा केल्या त्या अंकित कुमारच्या ८८ आणि अशोक मणेरियाच्या ७० धावांच्या मदतीने. रोहित शर्मा, निशांत सिंधू, राहुल टेवाटिया आणि सुमित कुमार यांनीही मोलाचं योगदान दिलं. सुमित कुमारला अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community