PM Narendra Modi : AI चा वापर करून तमिळ जनतेशी मोदींनी साधला हिंदीत संवाद

पीएम मोदी यांनी यांच्या भाषणामध्ये पहिल्यांदा एआय या प्रणालीचा वापर केला आहे. सभेला जमलेल्या तमिळ जनतेशी 'भाषिणी' या अनुवाद प्रणालीद्वारे थेट संवाद साधला.

267
PM Narendra Modi : AI चा वापर करून तमिळ जनतेशी मोदींनी साधला हिंदीत संवाद
PM Narendra Modi : AI चा वापर करून तमिळ जनतेशी मोदींनी साधला हिंदीत संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी दौऱ्यावर गेले आहेत. पीएम मोदी यांनी यांच्या भाषणामध्ये पहिल्यांदा एआय या प्रणालीचा वापर केला आहे. रविवारी (१७ डिसेंबर) त्यांनी सभेला जमलेल्या तमिळ जनतेशी ‘भाषिणी’ या अनुवाद प्रणालीद्वारे थेट संवाद साधला. मोदींनी त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी या दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी काशी-तमिळ-संगम (Kashi Tamil Sangam) या  कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांचे हिंदीतील भाषण तमिळमध्ये एआय  द्वारे पहिल्यांदाच भाषांतरीत केले. (PM Narendra Modi)

मी हिंदीत बोलेन मला तमिळमध्ये उत्तर द्यायला मदत होईल.
भाषणाच्या सुरवातीलाच पंतप्रधान मोदींनी तमिळ जनतेला इअरफोन लावण्याची विनंती केली. मोदी म्हणले ‘हरहर महादेव’ , वणक्कम काशी, वणक्कम तामिळनाडू जे तामिळनाडूहून आले आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी एआय वापरताना इअरफोन लावा. मोदी म्हणाले की ठीक आहे का ? तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल का ? माझा पहिलाच अनुभव आहे. मी भविष्यात हे वापरेन. तुम्ही मला अभिप्राय द्यावा आता मी हिंदीत बोलेन मला तमिळमध्ये उत्तर द्यायला मदत होईल. (PM Narendra Modi)

(हेही वाचा :Vijay Hazare Trophy : राजस्थानचा ३० धावांनी पराभव करत हरयाणाचा विजय हजारे चषकावर कब्जा )

भाषिणी  काय आहे ?
भाषिणी ही एक AI आधारित भाषांतर प्रणाली आहे. याद्वारे एखादी व्यक्ती स्वतःच्या भाषेत बोलू शकते, पण श्रोत्याला ते भारतातील इतर भाषांमध्ये देखील समजू शकते. हे Android आणि IOS प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. या अॅपमध्ये भाषादान नावाची सुविधा देखील आहे, याद्वारे वापरकर्ता देखील सिस्टममध्ये योगदान देऊ शकतो. तामिळनाडूतून काशीला येणे म्हणजे महादेवाच्या एक घरातून दुसऱ्या घरात येणे.

तामिळनाडूतून काशीला येणे म्हणजे मदुराई मीनाक्षीहून काशी विलाक्षीला येणे. म्हणूनच तमिळनाडूतील आणि काशीतील लोकांच्या हृदयात असलेले प्रेम आणि बंध वेगळे आणि आद्वितीय आहे. मला खात्री आहे काशीची जनता तुमच्या सेवेत कोणतीही कसर सोडणार नाही. यापुढे बोलताना मोदी म्हणाले की या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा नवा वापरही येथे झाला आहे. ही एक नवीन सुरुवात आहे आणि आशा आहे की यामुळे तुमच्या पर्यंत पोहोचणे माझ्यासाठी सोपे झाले आहे. असेही मोदी यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.