अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या; ED ने पाठवली दुसरी नोटीस

188
दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या कार्यकाळात उघडकीस आलेला मद्य घोटाळा आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आणखी अडचणी वाढवणारा ठरणार आहे. त्यांच्या विरोधात ED ने दुसरी नोटीस पाठवली आहे. त्यांना EDने २१ डिसेंबर रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे.

२२ जणांहून अधिक जणांना केलीय अटक 

या मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी ED ने या आधी २ नोव्हेंबर रोजी पहिली नोटीस पाठवून चौकशीला बोलावले होते. मात्र केजरीवाल तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे आता ED  केजरीवाल यांना दुसरी नोटीस पाठवली आहे. या घोटाळ्यात आप पक्षाचे मोठे नेते तुरुंगात आहे. त्यामध्ये उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह यांचा समावेश आहे. या सगळ्या घोटाळ्यात २२ हून अधिक जणांना अटक करण्यात आलेली आहे. तर ३ आरोपी सरकारी साक्षीदार झाले आहेत. गेल्या वर्षी जुलै २०२२ मध्ये हा मद्य घोटाळा उघडकीस आला होता. मुख्य सचिवांच्या अहवालानंतर व्ही.के. सक्सेना यांनी या अहवालात या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. तपास सुरु होताच घोटाळ्यातील एक-एक बाबी समोर येऊ लागल्या.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.