केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने देशभरात आतापर्यंत प्रशाद (Pilgrimage Rejuvenation and Spiritual Heritage Augmentation Drive (PRASHAD)) योजना लागू करण्यात आली आहे. प्रशाद योजनेअंतर्गत 46 परियोजना आणि स्वदेश दर्शन (Swadesh Darshan Scheme) अंतर्गत एकूण 76 परियोजना राबवण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांचा समावेश आहे.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची मदत)
याशिवाय या दोन योजनांतर्गत विकास करण्यासाठी नवीन स्थळे निश्चित केली आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी (G. Kishan Reddy) यांनी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल लोकसभेत दिली. याविषयी हेमंत पाटील यांनी प्रश्न विचारला होता.
महाराष्ट्रातील स्थळांसाठी संमत करण्यात आलेला निधी
- प्रशाद (PRASHAD) योजनेत नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वरचा (Trimbakeshwar) विकास करण्यासाठी 52.92 कोटींचा निधी
- स्वदेश दर्शन योजनेत (Swadesh Darshan Scheme) सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील सागरेश्वर, तारकर्ली, विजयदुर्ग येथील चौपाटी आणि खाडी किनाऱ्यांच्या विकासासाठी 19.06 कोटी रुपये
- नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील वाकी – अडासा – धापेवाडा – परादसिंघा – तेलंखंडी- गिराड यांच्यासाठी 53.96 कोटी रुपये
(हेही वाचा – Banganga : वाराणसीच्या धर्तीवर मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा विकास, जीर्णोद्धार कामांचे झाले भूमिपूजन)
याशिवाय प्रशाद (PRASHAD) योजनेंतर्गत नवीन परियोजनेत औरंगाबाद (Aurangabad) येथील श्री गुरुसनेश्वर शिवालय, उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्रीक्षेत्र राजूर, जालना येथील गणपति मंदिर यांचा, तर स्वदेश दर्शन 2.0 अंतर्गत सिंधुदुर्गचा विकास करण्यात येणार आहे.
पर्यटन मंत्रालयाच्या वतीने ‘तीर्थस्थान जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन अभियाना’त (प्रशाद) (Pilgrimage Rejuvenation and Spiritual Heritage Augmentation Drive (PRASHAD)) तथा ‘स्वदेश दर्शन’ (एसडी) (Swadesh Darshan Scheme) योजनेअंतर्गत देशभरातील धार्मिक स्थळासह पर्यटन क्षेत्राचा जीर्णोद्धार करण्यासाठी राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक साहाय्य देण्यात येते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community