मुंबई महानगरात वृक्षवल्ली अधिकाधिक बहरावी आणि त्या निमित्ताने पर्यावरण संतुलन टिकून राहावे, यासाठी मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) अनेक उपक्रम हाती घेत असते. मुंबईत मुळातच जागेची कमतरता असल्याने येथे उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू असतात. याच प्रयत्नातून मुंबई महानगरपालिकेने ‘ग्रीनिंग मुंबई’ (Greening Mumbai) ही माहिती पुस्तिका तयार केली आहे. या माहिती पुस्तिकेत पर्यावरणविषयक शास्त्रीय माहिती आहे. तिचा मुंबईकरांना वृक्षारोपण करताना नक्कीच फायदा होईल, असे विश्वास महापालिका अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी व्यक्त केला आहे. (Greening Mumbai Booklet)
(हेही वाचा – BMC Public Toilets : संडासवरून आमदार आणि माजी नगरसेवकांमध्ये वाद)
मुंबईतील घरांची बाल्कनी, इमारतींचे छत, गृहनिर्माण संस्थांचे आवार, लहान लहान बगीचे आदी ठिकाणी कमीत कमी जागेत विविध प्रकारची रोपटी, झाडे, फुल-फळ झाडे कशी लावावीत, यासाठी महानगरपालिकेने ‘डब्ल्यूआरआय इंडिया’ (WRI India) या संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘ग्रीनिंग मुंबई’ (Greening Mumbai) या मार्गदर्शक पुस्तिकेचे महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी १८ डिसेंबर २०२३ ला प्रकाशन करण्यात आले. (Greening Mumbai Booklet)
(हेही वाचा – Banganga : वाराणसीच्या धर्तीवर मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा विकास, जीर्णोद्धार कामांचे झाले भूमिपूजन)
उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, उप अधीक्षक (वृक्ष प्राधिकरण) ज्ञानदेव मुंडे, ‘डब्ल्यूआरआय इंडिया’ (WRI India) च्या कार्यक्रम प्रमुख लुबैना रंगवाला, ‘ओइकोस फॉर इकोलॉजिकल सर्व्हिसेस आणि ट्रान्सफॉर्मिंग’च्या कीर्ति वाणी, टाटा समाज विज्ञान संस्था अर्थात ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’च्या (TISS) अविनाश कौर आदी मान्यवरांसह पर्यावरणविषयक अभ्यासक उपस्थित होते. (Greening Mumbai Booklet)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community