विनोदाला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवणारे Om Prakash

206

विनोद आणि ओमप्रकाश हे जणू समीकरण झाले होते. त्या काळी अनेक आघाडीच्या विनोदी चित्रपटांमध्ये ओम प्रकाश (Om Prakash) झळकले आणि त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर आपला ठसा उमटवला. ओम प्रकाश यांचा जन्म १९ डिसेंबर १९१९ मध्ये लाहोर येथे झाला. १९३७ मध्ये ते २५ रुपये मासिक पगारावर ऑल इंडिया रेडिओ येथे रुजू झाले. ’फतेह दिन’ या त्यांचा रेडिओवरील कार्यक्रम खूपच लोकप्रिय ठरला.

एका लग्नात चित्रपट निर्माते दलसुख पांचोली यांनी ओम प्रकाश (Om Prakash) यांना लोकांचे मनोरंजन करताना पाहिले आणि दासी चित्रपटात त्यांना काम करण्याची संधी दिली. त्यावेळी त्यांना जरी फक्त ८० रुपये मानधन मिळाले असले तरी या चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. पुढे पांचोलींच्या धमकी आणि आयी बहार या चित्रपटात त्यांनी काम केले.

(हेही वाचा Terrorism : दहशतवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र…?)

फाळणीनंतर ते दिल्ली आणि नंतर मुंबईत आले. लाहोर, चार दिन आणि रात की रानी सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका करुन त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी दिलीप कुमारसोबत आझाद, राज कपूरसोबत मेरा नाम जोकरमध्ये भूमिका केल्या, किशोर कुमारसोबत मिस मेरी, बहार, पहली झलक, आशा आणि मन-मौजी, त्यानंतर अशोक कुमारसोबत हावडा ब्रिज आणि देव आनंदसोबत तेरे घर के सामने अशा चित्रपटांत काम केले.

ओम प्रकाश (Om Prakash) यांनी सुमारे ३०७ चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अभिनयाची, विनोदाची स्वतःची एक शैली निर्माण केली होती. त्यामुळेच ते जवळजवळ ४० वर्षे फिल्म इंडस्ट्रीमध्ये टिकून राहू शकले. २१ फेब्रुवारी १९९८ मध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा म्रुत्यू झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.