केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी (१८ डिसेंबर) भारतातील कोरोना (Kerala Coronavirus) सक्रिय रुग्णांची संख्या १,८२८ इतकी झाली असून केरळमध्ये एका दिवसात १११ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देशाचा रिकव्हरी रेट हा ९८.८१ टक्के
तसेच कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४.४६ कोटींवर पोहोचली आहे. तर देशाचा रिकव्हरी (Kerala Coronavirus) रेट हा ९८.८१ टक्के एवढा झाला आहे. कोविड-19 मुळे आतापर्यंत ५,३३,३१७ लोकांचा मृत्यू झाला असून मृत्यू दर १.१९ टक्के झाला आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीचे २२०.६७ कोटी डोस देण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Chandrkant Patil : नवीन शैक्षणिक धोरणातही ‘एआय’चा समावेश- उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील)
एकूण ५ मृत्यू
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, रविवारी भारतात ३३५ नवीन कोविड-19 (Kerala Coronavirus) रुग्णांची नोंद करण्यात आली. तर केवळ केरळमध्ये चार आणि उत्तर प्रदेशात एक अशा पाच मृत्यूंची नोंद झाली आहे.
(हेही वाचा – China Earthquake : १११ जणांचा मृत्यू, मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु)
आरटी पीसीआरची टेस्टिंग वाढविण्याची गरज
अशा परिस्थितीत आरटी पीसीआरचा वापर करून टेस्टिंग (Kerala Coronavirus) वाढवावी लागेल. सर्व प्रकारच्या तापांचे नियमितपणे मॉनिटरिंग करावे लागले. तसेच, एखाद्या रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याचे सॅम्पलही जिनोम सिक्वेंसिंगसाठी INSACOG LAB मध्ये पाठवण्यात यावे. असे केंद्र सरकारने सुचविले आहे. (Kerala Coronavirus)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community