तावडू (Cow Sanctuary) येथील हसनपूर गावात देशातील पहिले गाय अभयारण्य उभारण्यात येणार आहे. नूह जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या या अभयारण्यासाठी पंचायतीच्या जमिनीचा वापर केला जाईल. येथे गायींसाठी नैसर्गिक अधिवासासह चारा, पाणी यांचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या अभायरण्यासाठी गावातील पंचायतीने सहमती दर्शवली आहे. त्यांची जनुक बँकदेखील येथे संरक्षित केली जाईल. याबाबतचे आदेश पालिका आयुक्त पी. सी. मीना यांनी दिले आहेत. यासाठी एमसीजी आणि जीएमडीएने तयार केलेल्या प्रस्तावासाठी बैठक घेण्यात आली आहे.
निराधार गायींना नैसर्गिक अधिवास
शहरी भागात गायींची वाढती संख्या आणि गोशाळांच्या अभावामुळे या गायींकडे दुर्लक्ष होते. जर त्यांना चारा मिळाला नाही, तर या गायी प्लास्टिकसारखे विष खात आहेत, याचा परिणाम मानवावरही होत आहे. या विचाराने, निराधार गायींना आश्रय देणे, त्यांना वावरण्यासाठी नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे अभयारण्या बांधले जाणार आहे. येथील गोशाळांमधील गायींची स्थितीही अतिशय दयनीय आहे. त्यांना खायला घालण्यापासून त्यांची काळजी घेण्यापर्यंत कोणतीही व्यवस्था नाही. अभयारण्यात अशा गायीही ठेवल्या जाणार आहे. याकरिता त्यांच्या मालकांकडून शुल्कही आकारले जाईल. यामुळे त्या प्लास्टिक खाऊ शकणार नाहीत.
(हेही वाचा – China Earthquake : १११ जणांचा मृत्यू, मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु)
पायाभूत सुविधांसाठी २५ कोटी रुपये खर्च
अभयारण्याच्या पायाभूत सुविधांवर २५ कोटी रुपये खर्च केले जातील. त्यानंतर गुडगाव आणि मानेसर महानगरपालिका देखभालीचा खर्च उचलणार आहेत. या सुविधेच्या उन्नतीकरणासाठी सीएसआर निधीचाही वापर केला जाईल. याशिवाय लोकांकडून दान म्हणूनदेखील चारा घेतला जाईल. दुभत्या गायींसाठी एक दर निश्चित केला जाईल. त्यामुळे लोकं गाय विकत घेऊ शकतात. सरकारी नियमांनुसार, गोशाळा चालवणाऱ्या पंचायतीला वर्षाला ५१ रुपये आणि चारा लागवडीसाठी वर्षाला ७१०० रुपये दिले जातात. याचादेखील समावेश या योजनेत करण्यात येणार आहे.
‘ही’ आहेत वैशिष्ट्ये –
– गायींच्या जातीनुसार त्यांची वेगवेगळ्या गटात विभागणी केली जाईल.
– चराई क्षेत्रे तयार केली जातील.
– गायींच्या देशी जाती आणि त्यांच्या उत्पादनांसाठी एक केंद्र स्थापन केले जाईल. तेथे एक पशुवैद्यकीय रुग्णालय असेल.
– गायीपासून मिळणाऱ्या पंचामृतासाठी एका केंद्राची स्थापना केली जाईल.
– प्रौढ गायी, वासरे, बैल आणि संकरित जातींसाठी स्वतंत्र विभाग असेल.
– पाण्यासाठी विहिरी खोदल्या जातील.
-कार्यालयीन इमारत बांधली जाईल.
– हे अभयारण्य वन्यजीव आणि राष्ट्रीय उद्यानाच्या धर्तीवर काम करेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community