IPL 2024 : पुढील वर्षी आयपीएल नेमकी कधी, कुठे होणार? 

२२ मार्च ते ३१ मे या कालावधीत आयपीएल घेण्याचा बीसीसीआयचा विचार 

267
IPL 2024 : पुढील वर्षी आयपीएल नेमकी कधी, कुठे होणार? 
IPL 2024 : पुढील वर्षी आयपीएल नेमकी कधी, कुठे होणार? 

ऋजुता लुकतुके

२०२४ च्या आयपीएलसाठी बीसीसीआयने सध्या २२ मार्च ते ३१ मे अशा तारखा ठरवल्या आहेत. अर्थात, देशात पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका एप्रिल – मे महिन्यात होणार आहेत. त्यांचं वेळापत्रक जाहीर झालं की, या तारखांना मूर्त स्वरुप देण्यात येईल. आणि त्याचबरोबर स्पर्धेचं वेळापत्रकही नक्की करण्यात येईल, असं बीसीसीआयने खेळाडूंच्या लिलावापूर्वी संघ मालकांना कळवलं आहे.

(हेही वाचा-Weather Update: आठवडाभर थंडी कायम, विदर्भातही गारठा वाढण्याची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज)

आयपीएलच्या पाठोपाठ ४ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० विश्वचषक होणार आहे. तरीही सर्व महत्त्वाच्या क्रिकेट बोर्डांनी आपल्या खेळाडूंना आयपीएलसाठी उपलब्ध करून दिलं आहे. त्यामुळे हीच गोष्ट अधोरेखित होते की, आयपीएलचं महत्त्व आता वाढलं आहे. आणि टी-२० विश्वचषकाची तयारी म्हणूनही आंतरराष्ट्रीय संघ या स्पर्धेकडे पाहत आहेत.

ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड या सर्वच संघांनी आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. इंग्लंड, आयर्लंड आणि श्रीलंका हे संघ आयपीएल दरम्यान इतर मालिका खेळणार आहेत. त्यामुळे हे दौरे वगळता इतर कालावधीत त्यांनी खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी दिली आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडू जोस हेझलवूड आधी लिलावासाठी उपलब्ध खेळाडूंच्या यादीत होता. पण, तो मार्च आणि एप्रिलमध्ये पितृत्वासाठी रजा घेणार आहे. त्यामुळे तो फक्त मे महिन्यात उपलब्ध असेल. तर बांगलादेशने तस्किन अहमन आणि महम्मद इस्लाम हे आपले दोन्ही खेळाडू आता लिलावासाठी उपलब्ध नसल्याचं कळवलं आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.