भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) (Former Governor Raghuram Rajan) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल एक विधान केले आहे. हिंदुस्थानचा संभाव्य विकास दर २०४७ पर्यंत सरासरी ६ टक्के इतका राहिला, तर देशाची अर्थव्यवस्था निम्न मध्यम स्वरुपाची राहील. भारत वेगाने विकसित झाला नाही तर देश श्रीमंत होण्याआधीच म्हातारा देश होईल, असे रोखठोक विधान रघुराम राजन यांनी केले आहे.
माजी गव्हर्नर रघुराम राजन हे हैदराबाद येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. देशाने जर वेगवान गतीने विकास साधला नाही, तर आपला देश श्रीमंत होण्याआधीच लोकसंख्याशास्त्रीय पद्धतीनुसार म्हातारा होईल. म्हणजेच त्यावेळी हिंदुस्थानातील वृद्धांची संख्या प्रचंड असेल आणि हे अर्थव्यवस्थेवरील एक ओझे असेल, अशा अर्थाचे विधान रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. सध्याच्या घडीला देशाचा विकास दर वर्षाला सरासरी सहा टक्के इतका आहे. याची गोळाबेरीज केली तर दरवर्षी सहा टक्के या दराने १२ वर्षांनी देशाचा विकास दर दुप्पट होईल. त्यामुळे पुढील २४ वर्षांत हिंदुस्थानचे दरडोई उत्पन्न चौपट होईल. आजच्या घडीला देशाचे दरडोई उत्पन्न अडीच हजार डॉलरपेक्षा थोडे कमी आहे. या संख्येला चारने गुणले तर हा आकडा १० हजार डॉलर इतका होतो. त्यामुळे जर आपण सध्याच्या वाढीच्या दरानुसार गणना केली तर २०४७ पर्यंत आपला देश श्रीमंत होत नाही. २०४७ पर्यंत हिंदुस्थान कमी मध्यम उत्पन्न असलेला देश असेल, असेही ते म्हणाले.
(हेही पहा – IPL 2024 : पुढील वर्षी आयपीएल नेमकी कधी, कुठे होणार? )
विकसित देश श्रीमंत होण्याआधी सेवा क्षेत्रांकडे वळले
सध्याच्या वाढीचा वेग सर्व कामगारांना रोजगार देण्यासाठी पुरेसा नाही. काही विकसित देश श्रीमंत होण्याआधी उत्पादन क्षेत्राऐवजी सेवा क्षेत्रांकडे वळले आहेत. हे देश प्रामुख्याने सेवा आधारित अर्थव्यवस्थेत आहेत. श्रीमंत देशांमध्ये ७० टक्के कर्मचारी सेवा क्षेत्रात काम करतात, तर २० टक्के लोक उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहेत. तर प्रत्येकी ५ टक्के लोक बांधकाम आणि कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. भारतात महिलांची भागीदारी खूपच कमी आहे, असेही ते म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community