Dawood Ibrahim : दाऊद जिवंत आणि ठणठणीत, छोटा शकीलचा दावा

मीडिया रिपोर्टनुसार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आला असून त्याला पाकिस्तानच्या कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र पाकिस्तानने अद्याप अधिकृतरित्या याची पुष्टी केलेली नाही. तसेच दाऊदच्या निधनाच्या बातम्या देखील सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

330
Dawood Ibrahim : दाऊद जिवंत आणि ठणठणीत, छोटा शकीलचा दावा

दाऊद इब्राहिम जिवंत आणि ठणठणीत असून, मी त्याला रविवारी (१७ डिसेंबर) दिवसभरात अनेकदा भेटलो, असा दावा दाऊदचा (Dawood Ibrahim) खास छोटा शकीलने केला आहे.

भाई १००० टक्के फिट!

दाऊद (Dawood Ibrahim) रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर छोटा शकील याने भारतीय वृत्तवाहिनीशी बोलताना याचे खंडन केले. ही फेक न्यूज पाहून मलाही धक्का बसला. मात्र त्याची तब्येत उत्तम आहे. तसेच त्याने दाऊदवर विषप्रयोग केल्याचा आणि रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातमीचे खंडन केले आहे. भाई १००० टक्के फिट आहे. दाऊदच्या मृत्यूच्या अफवा चुकीच्या हेतूने पसरवल्या जात आहेत. तसेच रविवारी दिवसभरात काही वेळा आपली व दाऊदची भेट झाल्याचा दावाही त्याने केला.

(हेही वाचा – Neelam Gorhe : संसदीय आयुधांचा वापर करीत विषय मांडावेत)

दाऊदवर विषप्रयोग

कुख्यात डॉन आणि १९९३ मुंबई बॉम्बस्फोटाचा प्रमुख सूत्रधार दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) पाकिस्तानात कराचीमधील एका रुग्णालयात दोन दिवसांपासून दाखल झाल्याचे वृत्त पसरले. दाऊदवर विषप्रयोग झाला असून, तो रुग्णालयात असल्याची माहिती पाकिस्तानातील काही सोशल मीडिया हँडलद्वारे प्रसारित झाली. त्यानंतर, उलटसुलट चर्चांना उधाण आले. त्याच्यावर विषप्रयोग झाला, त्याचा मृत्यू झाला, अशाही चर्चा होत्या. ६७ वर्षीय दाऊद कराचीमधील एका रुग्णालयात भरती असून, रुग्णालयाच्या त्या मजल्यावर तो एकटाच आहे. वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर आणि जवळचे नातेवाईक यांनाच तिथे प्रवेश असल्याचीही चर्चा दिवसभर रंगली होती. मात्र, या वृत्ताला पाकिस्तान किंवा भारत सरकारने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

(हेही वाचा – Naveen-ul-Haq Banned : अफगाणिस्तानचा वादग्रस्त क्रिकेटपटू नवीन आपीटी लीगमधून २० महिन्यांसाठी निलंबित )

गुन्हेगारीच्या जगात कसा आला दाऊद?

दाऊद इब्राहिमचं (Dawood Ibrahim) खरं नाव शेख दाऊद इब्राहिम कासकर आहे. त्यांचे वडील शेख इब्राहिम अली कासकर हे मुंबई पोलिसांत हवालदार होते. आर्थिक अडचणींमुळे वडिलांनी त्याला शिक्षण सोडायला लावलं होतं. यानंतर दाऊद गुन्हेगारीच्या जगात आला. आधी त्यानं तत्कालीन डॉन हाजी मस्तानसोबत काम केलं आणि नंतर त्याच्यापासून वेगळं होऊन दुबईतून काम करायला सुरुवात केली. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात दाऊदचा हात होता.

(हेही वाचा – Tamil Nadu Rains: तामिळनाडूमध्ये ‘रेड अलर्ट’; सुरक्षा दलाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू)

एस. हुसैन झैदी यांच्या ‘मोस्ट वॉन्टेड एक, नाम अनेक’ या पुस्तकात दाऊदची (Dawood Ibrahim) १३ नावं असल्याचा दावा करण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात तो ‘मुच्छाद’ म्हणून ओळखला जात होता. भारतात तो ज्यावेळी फोन करतो, त्यावेळी तो हाजी साहेब किंवा अमीर साहेबांच्या नावानं हाक मारतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.