Sharad Pawar: खासदारांच्या निलंबनाबाबत शरद पवारांकडून नाराजी व्यक्त, राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहून लक्ष घालण्याची मागणी

शरद पवार यांनी आपल्या पत्रात धनकर यांच्याकडे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत त्रुटी आणि खासदारांचे निलंबन याप्रकरणी तातडीने चौकशीची मागणी केली आहे.

149
Sharad Pawar: खासदारांच्या निलंबनाबाबत शरद पवारांकडून नाराजी व्यक्त, राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहून लक्ष घालण्याची मागणी
Sharad Pawar: खासदारांच्या निलंबनाबाबत शरद पवारांकडून नाराजी व्यक्त, राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहून लक्ष घालण्याची मागणी

संसदेत तरुणांनी घुसखोरी केल्याने संसदेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सरकारला याचा जाब विचारणाऱ्या खासदारांचे निलंबन झाल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनकर यांना पत्र लिहिले आहे. धनकर यांनी घडलेल्या प्रकाराबाबत लक्ष घालण्याची मागणीही शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवार यांनी आपल्या पत्रात धनकर यांच्याकडे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत त्रुटी आणि खासदारांचे निलंबन याप्रकरणी तातडीने चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, सरकारला जाब विचारणाऱ्या खासदारांना निलंबित करण्यात आला. हा निर्णय सरकारचे उत्तरदायित्व आणि पारदर्शीपणा याच्या विपरीत आहे. संसदेतील वातावरण सुरक्षित असायला हवे. त्यात बाधा येत असेल तर त्याबद्दल जाब विचारण्याचा खासदारांना अधिकार आहे. ९० पेक्षा जास्त खासदारांनी सरकारकडे उत्तर मागितल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यातील ४५ खासदार राज्य सभेचे आहेत.

(हेही वाचा – Parliament winter session 2023 : सलग दुसऱ्या दिवशी खासदारांचे निलंबन, सुप्रिया सुळेंसह ४९ खासदार निलंबित)

लोकशाहीची मूल्ये जपली जाण्याबाबत काळजी
ज्यांनी घोषणा दिल्या नाहीत, ज्यांनी कामकाजात बाधा येईल, असे वर्तन केले नाही, त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण या प्रकरणात हस्तक्षेप करून लोकशाहीची मूल्ये जपली जाण्याबाबत काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.