- ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियन विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्सला २०.५ कोटी रुपये मोजून सनरायजर्स हैद्राबादने विकत घेतलं आहे. (IPL 2024 Auction)
आयपीएलच्या २०२४ हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव अपेक्षेप्रमाणेच कोटींच्या उड्डाणांचा ठरला आणि यात सगळ्यात मोठी बोली लागली ती ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सवर. सनरायजर्स हैद्राबाद संघाने कमिन्सला २०.५ कोटी रुपये देऊन विकत घेतलं. लिलावात सनरायजर्सचा हात नेहमी आखडता असतो. कमी पैशात पण, उपयुक्तता असलेले खेळाडू निवडण्याच्या रणनीतीमुळे हा संघ चतुर आहे. (IPL 2024 Auction)
पण, यावेळी त्यांनी पीट कमिन्ससाठी आपल्या तिजोरीची दारं उघडी केली आहेत. अष्टपैलू पॅट कमिन्स आता नेतृत्व गुणांसाठीही ओळखला जातोय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विजयी मानसिकता असलेला कर्णधार तो समजला जातो. (IPL 2024 Auction)
THE BIGGEST IPL BID EVER 😱
HISTORY CREATED here at the #IPLAuction
Australia’s World Cup winning captain Pat Cummins is SOLD to @SunRisers for a HISTORIC INR 20.5 Crore 💰💰💰💰#IPL pic.twitter.com/bpHJjfKwED
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
आयपीएल बरोबरच इतर टी-२० लीगमध्येही पॅट कमिन्स आघाडीचा खेळाडू आहे. (IPL 2024 Auction)
(हेही वाचा – Raj Kapoor Bungalow : राज कपूर यांच्या बंगल्याच्या जागी उभा राहणार ५०० कोटी रुपयांचा गोदरेज रहिवासी प्रकल्प)
कमिन्स व्यतिरिक्त इतर कुठल्या खेळाडूंवर कोट्यवधीची बोली लागली ते ही पाहूया,
डॅरिल मिचेल – १४ कोटी रु. (चेन्नई सुपरकिंग्ज)
हर्षल पटेल – ११.७५ कोटी रु. (पंजाब किंग्ज)
गेराल्ड कोत्झीए – ४ कोटी रु. (मुंबई इंडियन्स)
शार्दूल ठाकूर – ४ कोटी रु. (चेन्नई सुपरिकिंग्ज)
रचिन रवींद्र – १.८ कोटी रु. (चेन्नई सुपरकिंग्ज)
ट्रेव्हिस हेड – ६.८० कोटी रु. (सनरायजर्स हैद्राबाद) (IPL 2024 Auction)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community