अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानला EDची नोटीस; ३० कोटींचा घोटाळा

287

अभिनेता शाहरुख खान हा आता अडचणीत आला आहे. त्याची पत्नी गौरी खान ही ३० कोटींच्या घोटाळ्यात अडकली आहे. गौरी खानाला आता ED ने नोटीस पाठवली आहे. गौरी खान ही लखनऊ येथील रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपची बँड अॅम्बेसेडर आहे. कंपनीवर गुंतवणूकदार आणि बँकांना अंदाजे 30 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. गौरी खान ही या कंपनीच्या व्यवहारात येत आहे.

काय आहे प्रकरण?

तुलसियानी ग्रुपने गौरी खानला 2015 मध्ये ब्रँड अॅम्बेसेडर बनवले होते. लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटीमध्ये तुलसियानी ग्रुपचा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पातील एक फ्लॅट मुंबईतील रहिवासी किरीट जसवंत शहा यांनी 2015 मध्ये 85 लाख रुपयांना खरेदी केला होता. किरीट जसवंत शहा यांनी आरोप केला आहे की, कंपनीने त्यांना ना ताबा दिला, ना पैसे परत केले. यानंतर जसवंत शाह यांनी तुलसियानी ग्रुपचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी आणि गौरी खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. EDने गौरी खानला पाठवलेल्या नोटीसमध्ये तिला तुलसियानी ग्रुपने किती पैसे दिले आणि हे पैसे तिला कसे देण्यात आले याची विचारणा केली आहे. त्यासाठी कोणते करार करण्यात आले असून या कराराचे कागदही अंमलबजावणी संचालनालयाला दाखविण्यास सांगितले आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये किरीट जसवंत शाह यांनी गौरी खान यांच्यासह तुलसियानी ग्रुपचे संचालक अनिल कुमार आणि महेश तुलसियानी यांच्याविरुद्ध लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

(हेही वाचा Parliament winter session 2023 : सलग दुसऱ्या दिवशी खासदारांचे निलंबन, सुप्रिया सुळेंसह ४९ खासदार निलंबित)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.