BJP-NCP Alliance : ‘राष्ट्रवादी’ची भाजपशी ‘राजकीय तडजोड’, पण ‘वैचारिक दुरावा’

शिवसेनेच्या (शिंदे गट) काही आमदारांनी आमंत्रण स्वीकारून या स्मृती मंदिर स्थळाला भेट दिली मात्र सत्तेतील भाजपच्या दुसऱ्या मित्रपक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) एकही आमदार रेशीमबागकडे फिरकला नाही.

234
BJP-NCP Alliance : ‘राष्ट्रवादी’ची भाजपशी ‘राजकीय तडजोड’, पण ‘वैचारिक दुरावा’
BJP-NCP Alliance : ‘राष्ट्रवादी’ची भाजपशी ‘राजकीय तडजोड’, पण ‘वैचारिक दुरावा’

परंपरेनुसार भारतीय जनता पक्षाच्या (BJP) आमदारांनी मंगळवारी (१९ डिसेंबर) नागपूर (Nagpur) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय रेशीमबाग (Reshibaug) येथील स्मृती मंदिर परिसरातील आद्यसरसंघचालक डॉ. हेगडेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला भेट घेऊन दर्शन घेतले. यावेळी शिवसेनेच्या (शिंदे गट) काही आमदारांनी आमंत्रण स्वीकारून या स्मृती मंदिर स्थळाला भेट दिली मात्र सत्तेतील भाजपच्या दुसऱ्या मित्रपक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) एकही आमदार रेशीमबागकडे फिरकला नाही. याचा अर्थ, सरकारमध्ये भाजपला दिलेला पाठिंबा ही एक ‘राजकीय तडजोड’ असून ‘वैचारिक दुरावा’ कायम असल्याचेच संकेत दिले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (BJP-NCP Alliance)

मित्रपक्षांच्या आमदारांना निमंत्रण

दरवर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी (Winter session) आलेल्या भाजपच्या आमदारांना अधिवेशन संपण्यापूर्वी एक दिवस आधी रेशीमाग येथे संघाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली जाते. यंदा प्रथमच भाजपकडून सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या आमदारांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. भाजपच्या सर्व आमदारांनी ‘पक्षकार्य’ श्रेष्ठ मानून स्मृती मंदिर परिसराला भेट दिली आणि समाधी दर्शन घेतले. (BJP-NCP Alliance)

शिवसेनेच्या आमदारांची उपस्थिती

शिवसेनेच्या काही आमदारांनी आमंत्रण स्वीकारून या स्थळाला भेट दिली. यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य प्रतोद भरत गोगावले, आमदार आशिष जैयवाल, विधानपरिषद सदस्या मनीषा कायंदे व अन्य काही आमदारांचा समावेश आहे. यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांचा त्यांना परिचय करून देण्यात आला तसेच संघाच्या विविध उपक्रमांबाबतची माहिती पुस्तिका आमदारांना भेट दिली गेली. (BJP-NCP Alliance)

(हेही वाचा – अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानला EDची नोटीस; ३० कोटींचा घोटाळा)

कुणालाही सक्ती केली नाही

याबाबत भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही मित्रपक्षांना आमंत्रित केले होते. त्यातील शिवसेनेच्या काही आमदारांनी आमंत्रण स्वीकारून आरएसएस मुख्यालयाला (RSS HQ) भेट दिली. येण्याबाबत कुणावरही सक्ती नव्हती.” (BJP-NCP Alliance)

गेल्या वर्षी (२०२२) एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हिवाळी अधिवेशन (Winter session) संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यासोबत स्मृती मंदिर येथे भेट देऊन डॉ. हेगडेवारांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. (BJP-NCP Alliance)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.