Tamilnadu Rains : मोडला 152 वर्षांचा विक्रम; या दोन ठिकाणी एका दिवसात झाला वर्षभराइतका पाऊस

हवामान खात्याकडे झालेल्या नोंदींनुसार तिरुनेलवेली आणि थुथुकुडी जिल्ह्यांमध्ये 17 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान 24 तासांत 670 मिमी ते 932 मिमी पाऊस झाला आहे. हा या जिल्ह्यांतील वर्षभराच्या पावसाइतका आहे.

231
Tamilnadu Rains : मोडला 152 वर्षांचा विक्रम; या दोन ठिकाणी एका दिवसात झाला वर्षभराइतका पाऊस
Tamilnadu Rains : मोडला 152 वर्षांचा विक्रम; या दोन ठिकाणी एका दिवसात झाला वर्षभराइतका पाऊस

दक्षिण तमिळनाडूमध्ये पुराने हाहाकार उडवला आहे. (Tamilnadu Rains) दक्षिण तमिळनाडूतील प्रचंड पावसामुळे कन्याकुमारी (Kanyakumari), तिरुनेलवेली (Tirunelveli), थूथुकुडी (Thoothukudi) आणि तेनकासी (Tenkasi) या जिल्ह्यांत जनजीवन कोलमडले आहे. भातशेती पाण्याखाली गेली आहे. तर रस्ते, पुलांसह रहिवासी इमारतीही पाण्यात बुडाल्या आहेत.

(हेही वाचा – BJP-NCP Alliance : ‘राष्ट्रवादी’ची भाजपशी ‘राजकीय तडजोड’, पण ‘वैचारिक दुरावा’)

हवामान खात्याकडे झालेल्या नोंदींनुसार तिरुनेलवेली (Tirunelveli) आणि थुथुकुडी (Thoothukudi) जिल्ह्यांमध्ये 17 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान 24 तासांत 670 मिमी ते 932 मिमी पाऊस झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये एवढा पाऊस संपूर्ण वर्षभरात पडतो. या जिल्ह्यांसोबतच टेंकासी आणि कन्याकुमारी जिल्ह्यांमध्येही प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आहे. येथे भारतीय लष्कर, नौदलासह एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक बचाव कार्य करत आहेत.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M.K.Stalin) यांनी मंगळवार, १९ डिसेंबर रोजी याविषयी निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, ”गेल्या 24 तासांत काही ठिकाणी 1871 नंतर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. एकट्या कायलपट्टीनममध्ये एका दिवसात 940 मिमी पाऊस झाला. तिरुनेलवेली आणि थुथुकुडी जिल्ह्यात राहणारे सुमारे 40 लाख लोक पुरामुळे त्रस्त झाले आहेत.” (Tamilnadu Rains)

(हेही वाचा – Dada Bhuse : बसस्थानकांच्या नुतनीकरणासाठी ६०० कोटी; दादा भुसे यांची विधानसभेत माहिती)

राज्याचे मुख्य सचिव शिवदास मीना (Shivdas Meena) यांनीही बचावकार्याची माहिती सांगितली आहे. शिवदास मीना म्हणाले की, आतापर्यंत 10082 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. थुथुकुडीजवळ एका गर्भवती महिलेसह 55 महिला आणि 19 मुलांसह 100 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हटवण्यात आले आहे.

18-19 डिसेंबर या दिवशीही तामिळनाडूतील कन्याकुमारी (Kanyakumari), तिरुनेलवेली (Tirunelveli), थुथुकुडी (Thoothukudi), रामनाथपुरम (Ramanathapuram), पुदुकोट्टई (Pudukottai) आणि तंजावर (Thanjavur) जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Tamilnadu Rains)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.