Calcutta High Court : न्यायमूर्तींचा वकिलाला अटक करण्याचा आदेश; बार असोसिएशनने घेतली ‘ही’ भूमिका

न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय एका प्रकरणाची सुनावणी करत असताना अॅडवोकेट प्रोसेनजीत मुखर्जी हसले. त्यामुळे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी प्रोसेनजीत मुखर्जी यांना अटक करण्याचा आदेश दिला.

660
Calcutta High Court : न्यायमूर्तींचा वकिलाला अटक करण्याचा आदेश; बार असोसिएशनने घेतली 'ही' भूमिका
Calcutta High Court : न्यायमूर्तींचा वकिलाला अटक करण्याचा आदेश; बार असोसिएशनने घेतली 'ही' भूमिका

कोलकाता उच्च न्यायालयाचे (Calcutta High Court) न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय (Justice Abhijit Gangopadhyay) यांनी अॅडवोकेट प्रोसेनजीत मुखर्जी यांना अटक करण्याचा आदेश दिला. त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान करण्याचा आरोप केला आहे. बार असोसिएशनने (Bar Association) यावर आक्षेप घेत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी.एस्. शिवगणनम् यांच्याकडे मागणी केली की, न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांची सर्व न्यायिक कार्ये परत घेतली जावीत.

(हेही वाचा – Iceland Volcano : ‘या’ देशात २४ तासांत झाले ८०० हून अधिक भूकंप; रस्त्यात मध्येच पडली मोठी भेग)

सुनावणी चालू असतांना वकील हसले

या वेळी अॅडवोकेट यांनी म्हटले की, न्यायमूर्ती गंगोपाध्याय (Justice Abhijit Gangopadhyay) न्यायालयात असतांना आमच्या संघटनेचा कोणताही सदस्य न्यायालयात पाय ठेवणार नाही. त्यांनी अॅडवोकेट मुखर्जी यांची क्षमा मागितली पाहिजे.

न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय १८ डिसेंबर या दिवशी ‘पश्‍चिम बंगाल मदरसा सेवा आयोगा’शी (West Bengal Madrasah Service Commission) संबंधित एका प्रकरणाची सुनावणी करत होते. तेव्हा न्यायालयात अधिवक्ता प्रोसेनजीत मुखर्जी उपस्थित होते. ते सुनावणी चालू असतांना हसले. त्यामुळे न्यायमूर्तींनी त्यांना अटक करण्याचा आदेश दिला. (arrest order to advocate)

(हेही वाचा – Maratha Reservation वर मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा; म्हणाले…)

वकिलांना अटक करण्याचा आदेश

न्यायमूर्ती गंगोपाध्याय म्हणाले, “गेल्या चार वर्षांपासून एक विधवा घरोघरी फिरत आहे आणि मदरशाचा वकील कोर्टात हसत आहे?” न्यायालयाने प्रोसेनजीत मुखर्जी (Advocate Prosenjit Mukherjee) यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले. या वेळी मुखर्जी यांनी बिनशर्त माफी मागूनही न्यायालयाने अर्ज स्वीकारला नाही. (Calcutta High Court)

न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांनी शेरीफला बोलावून वकिलाला त्यांच्या ताब्यात दिले. शिवाय, न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी मदरसा सेवा आयोगाच्या अध्यक्षांना दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.

(हेही वाचा – Tamilnadu Rains : मोडला 152 वर्षांचा विक्रम; या दोन ठिकाणी एका दिवसात झाला वर्षभराइतका पाऊस)

त्यानंतर अॅडवोकेट मुखर्जी यांनी न्यायमूर्ती हरीश टंडन आणि न्यायमूर्ती हिरण्मय भट्टाचार्य यांच्या खंडपिठाकडे न्याय देण्याची मागणी केली. तेव्हा त्यांनी न्यायमूर्ती गंगोपाध्याय (Justice Abhijit Gangopadhyay) यांच्या निर्णयाला स्थगिती दिली. (Calcutta High Court)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.