नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी (Winter session) शासनाच्या अधिकाऱ्यांसाठी शासनाच्यावतीने सर्व प्रकारची व्यवस्था केली जात असली तरी प्रत्यक्षात शासनाकडून महापालिकेकडे नागपूर येथे दोन रुमची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. नागपूर येथील हॉटेलमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दोन रुमची व्यवस्था करण्याची ही विनंती मात्र महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) फेटाळून लावली आहे. यापूर्वी अशाप्रकारची कधीही सुविधा महापालिकेच्यावतीने दिलेली नसल्याने यापुढेही देता येत नाही असे सांगत ही विनंती नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (BMC)
नगरविकास खात्याचे अवर सचिव शरद डोके यांच्या स्वाक्षरीने २९ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई महापालिकेचे उपायुक्त तथा विधीमंडळ समन्वय अधिकारी यांच्या नावे पत्र पाठवण्यात आले. ज्यात त्यांनी सन २०२३ च्या (तिसरे) हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) कालावधीसाठी अधिकाऱ्यांकरीता नागपूर येथे राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. (BMC)
(हेही वाचा – Maratha Reservation वर मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा; म्हणाले…)
सन २०२३ चे (तिसरे) हिवाळी अधिवेशन (Winter session) ०७ डिसेंबर २०२३ पासून नागपूर येथे सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या कालावधीत या कार्यासनास प्राप्त होणारा विधानमंडळ आयुधांचा आवाका जास्त प्रमाणात असल्याने या कार्यासनातील अधिकारी यांना अधिवेशनाच्या कामकाजाकरीता नागपूर (Nagpur) येथे उपस्थित राहणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे प्राप्त निर्देशानुसार, आपणांस कळविण्यात येते की, या कार्यासनातील अधिकारी यांच्यासाठी नागपूर येथे आपण संपूर्ण अधिवेशन कामकाज कालावधीसाठी २ रूमची व्यवस्था करण्यात यावी, असे या पत्रात म्हटले होते शासनाकडून अशाप्रकारचे पत्र यापूर्वीही प्राप्त झाले होते, परंतु ही मागणी मान्य करण्यात आलेली नव्हती. पण यंदाही ही मागणी आयुक्तांनी मान्य केलेली नसल्याचे माहिती मिळत आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community