Veer Savarkar Mukti Shatabdi : सन्मान सावरकरांचा, जागर हिंदुत्वाचा; स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने ६ जानेवारी या दिवशी पुणे-मुंबई यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर तुरुंगांमध्येही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ८ जानेवारीला पुणे येथील येरवडा कारागृहात विशेष कार्यक्रम होणार आहे.

505
Veer Savarkar Mukti Shatabdi : सन्मान सावरकरांचा, जागर हिंदुत्वाचा; स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
Veer Savarkar Mukti Shatabdi : सन्मान सावरकरांचा, जागर हिंदुत्वाचा; स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

१४ वर्षांच्या कठोर कारावासानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांची मुक्तता झाली, तो दिवस होता ६ जानेवारी १९२४! यंदा त्या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. (Veer Savarkar Mukti Shatabdi) त्या निमित्ताने मुंबई येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’च्या वतीने ‘सन्मान सावरकरांचा, जागर हिंदुत्वाचा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ६ जानेवारी रोजी येरवडा कारागृह, पुणे ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) मुंबई अशी भव्य ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा’ काढण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर तुरुंगांमध्येही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर ८ जानेवारीला पुणे येथील येरवडा कारागृहात विशेष लघुपट दाखवला जाणार असून एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण केले जाणार आहे.

(हेही वाचा – Santa Cruz Chembur Junction : सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्यावरील ५ बांधकामांवर बुलडोझर)

हिंदूसंघटन हा कार्यक्रमांचा उद्देश

अंदमान (Andaman), रत्नागिरी (Ratnagiri) आणि शेवटी येरवडा (Yerawada) इथे कारावास भोगून, अनन्वित यातना, छळ सोसून सावरकर ६ जानेवारी १९२४ ला येरवडा कारागृहातून बाहेर पडले. ८ जानेवारी १९२४ ला त्यांना रत्नागिरीला नेण्यात येऊन स्थानबद्ध करण्यात आलं ते पुढची १३ वर्षे. पण या तेरा वर्षांच्या ‘वनवासात’, ब्रिटिशांच्या ‘नजरेखाली’ असूनही त्यांनी अफाट सामाजिक कार्य केले. केवळ रत्नागिरीतील अस्पृश्यता नष्ट केली नाही, तर जात्युच्छेदन चळवळ उभारली. आपल्या पूर्वास्पृश्य बांधवाना मंदिर प्रवेशच नाही, तर गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्याचा मान मिळवून दिला. त्यांना मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न केला. १०० वर्षांनंतर आज पुन्हा एकदा आपण जातीजातींत विभागले जात आहोत. भलेही आपण सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असू; पण एक समाज म्हणून आपली अधोगतीच होत आहे. जाणूनबुजून आपल्या विभाजनाचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आज आवश्यकता आहे हिंदूंच्या एकजुटीची. हिंदुस्थानातच हिंदूंच्याच अस्तित्वासाठी लढण्याची. त्या हिंदूसंघटनाच्या उद्देशाने हे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

अशी असेल यात्रा…
  • शनिवार, ६ जानेवारी रोजी सकाळी ७.०० वाजता येरवडा कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रे’ची सुरुवात होईल.
  • कारागृहाबाहेर NCC कॅडेट्स स्वातंत्र्यवीर सावरकरांना (Veer Savarkar) मानवंदना देतील.
  • ढोल-ताशा पथक, लेझिम पथक, याशिवाय सायकलस्वार, दुचाकीस्वार, गाड्या, बसेससह यात्रा येरवडा कारागृह, पुणे येथून मार्गस्थ होईल.
  • डेक्कन जिमखान्यावरील सावरकर स्मारक, खडकी बाजार, दापोडी, पिंपरी, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, लोणावळा (मॅप्रो जवळ विश्रांती थांबा), कामशेत, खोपोली, खालापूर, खारघर, जुईनगर, वाशी, चेंबूर ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई (जुना मुंबई पुणे मार्ग ) असा यात्रेचा मार्ग असेल.
  • अनेक मान्यवर आणि राष्ट्रप्रेमी मोठ्या संख्येने दुचाकी आणि चारचाकी घेऊन यात्रेत सहभागी होणार आहेत.
  • गावागावात यात्रेचे स्वागत केले जाईल.

या मार्गावर समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Atul Save : मुंबईच्या डोंगरीतील उपकरप्राप्त इमारत दुरुस्तीची चौकशी; अतुल सावे यांची घोषणा)

महाराष्ट्रातील विविध कारागृहांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन

६ जानेवारी २०२४ या दिवशी महाराष्ट्रातील विविध कारागृहांत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी’ (Veer Savarkar Mukti Shatabdi) साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी महाराष्ट्रातील तुरुंगांत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. यानंतर एखादा बंदीवान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याबद्दल आपले विचार व्यक्त करेल. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने तयार करण्यात आलेला ‘समाज क्रांतिकारकाची यशोगाथा (रत्नागिरी पर्व)’ हा ५५ मिनिटांचा लघुपट कारागृहातील कर्मचारी आणि बंदिवान यांना दाखवण्यात येणार आहे. राष्ट्रगीत, तसेच राज्य गीत गायनानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल.

यानिमित्ताने कैद्यांमध्ये देशभक्ती वाढीस लागावी, तसेच स्वातंत्र्य आणि सामाजिक समता या दोन्ही विषयांवर प्रबोधन व्हावे, या उद्देशाने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय गावागावांमध्येही ६ जानेवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना देण्यात येईल.

(हेही वाचा – IPL Auction 2024 : कमिन्सला मागे टाकून मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात महागडा खेळाडू)

८ जानेवारीला पुणे येथील येरवडा कारागृहात एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण

८ जानेवारीला पुण्यातील येरवडा (Yerawada) कारागृह येथे सकाळी १० ते १२.३० या कालावधीत कार्यक्रम होणार आहे. या वेळी ‘समाज क्रांतिकारकाची यशोगाथा (रत्नागिरी पर्व)’ हा लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. कारागृहातील कैद्यांना सावरकरांच्या कार्याची ओळख व्हावी, यासाठी सायली गोडबोले- जोशी यांचा यमुनाबाई उर्फ माई सावरकर यांच्यावरील एकपात्री प्रयोग आणि सावरकरांच्या सुटकेवरील प्रांजल अक्कलकोटकर लिखित सुमारे पंधरा ते वीस मिनिटांचे नाट्य सादर करण्यात येणार आहे. (Veer Savarkar Mukti Shatabdi)

हेही पहा  – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.