MLA BMC Budget Fund : विधानसभा क्षेत्रात महापालिकेच्या निधीतून खर्च : आमदारांनी सुचवलेल्या सर्व कामांसाठी एकच कंत्राटदार

मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असून नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात असल्याने विभागातील विकासकामे करण्यासाठी विधानसभा निहाय आमदारांना २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

979
Maharashtra Bhushan Award : त्या कार्यक्रमासाठी मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून केला 'हा' खर्च
Maharashtra Bhushan Award : त्या कार्यक्रमासाठी मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून केला 'हा' खर्च

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विधानसभा निहाय २५ कोटी रुपयांचा विकासकामांसाठी आमदारांना निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून पालकमंत्र्यांच्या मंजुरीने आमदारांच्या मतदार संघातील सेवा सुविधांसाठी प्राप्त होणाऱ्या निधीचा वापर करण्यासाठी केवळ एकाच कंत्राटदाराची निवड करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. प्रत्येक आमदारांनी सुचवलेल्या सर्व कामांसाठी एकाच कंत्राटदाराची निवड करून त्यांच्या मार्फतच ही कामे करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. (MLA BMC Budget Fund)

२५ कोटी रुपयांचा निधी

मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असून नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात असल्याने विभागातील विकासकामे करण्यासाठी विधानसभा निहाय आमदारांना २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सन २०२३-२४ च्या आर्थिक वर्षांसाठी हा निधी उपलब्ध करून देताना पालकमंत्र्यांच्या मंजुरीने विकासकामांसाठी निधी दिला जाणार आहे. त्यानुसार आमदारांनी सुचवलेल्या कामांना मंजुरी मिळाल्यांनतर निधीच्या वापरास मान्यता दिली जाते. त्यानुसार आमदारांनी सुचवलेल्या एकूण कामांसाठी ८० टक्के निधी हा मंजूर केला जातो आणि उर्वरीत २० टक्के निधी हा आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (MLA BMC Budget Fund)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा क्षेत्रात आमदारांनी सुचवलेल्या विविध कामांसाठी सध्या २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्या सर्व कामांसाठी एकाच कंत्राटदाराची निवड करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आमदार, लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांसाठी स्वतंत्र निविदा काढून कंत्राटदाराची निवड करणे गरजेच असताना या सर्व कामांसाठी एकाच कंपनीची निवड करून त्याच्याकडूनच हे काम करून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. (MLA BMC Budget Fund)

(हेही वाचा – Calcutta High Court : न्यायमूर्तींचा वकिलाला अटक करण्याचा आदेश; बार असोसिएशनने घेतली ‘ही’ भूमिका)

ई निविदा पध्दतीचा अवलंब

आमदारांनी सुचवलेल्या कामांची विभागीय अधिकाऱ्यांकडून स्थळ पाहणी करून कामांची गरज तथा आवश्यकता व्यवहार्यता तसेच तांत्रिक बाबी तपासून या कामांसाठीचा निधी मंजूर केला जातो. यासर्व कामांकरता एक सामायिक दरसुचीनुसार अंदाजपत्रकाप्रमाणे निविदा मागवून एकच कंत्राटदार नेमला जाणार जाईल आणि प्रत्येक कामांसाठी याच कंत्राटदाराला संगणकीय सॅप प्रणालीमध्ये कामाचे डब्ल्यूपीएस इलिमेंट्स तयार करण्यात येतील आणि त्याप्रमाणे स्वतंत्र कार्यादेश निवड झालेल्या त्या एकाच कंपनीला दिले जातील अशी माहिती मिळत आहे. (MLA BMC Budget Fund)

काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या दोन नगरसेवकांसाठी एक कंत्राटदाराची निवड करून त्यांच्या नगरसेवक व विकासकामांसाठी निधीतून पायाभूत कामे सीडब्ल्यूसी कंत्राटाअंतर्गत दिली जात होती. परंतु पुढे या पध्दतीला विरोध झाल्यानंतर ई निविदा पध्दतीचा अवलंब करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात आमदारांच्या विधानसभा क्षेत्रात सर्व प्रकारच्या कामांसाठी एकच कंत्राटदार नेमण्याचा प्रकार हाही एकाच कंपनीचे भले करणारे आहे, असे बोलले जाते. (MLA BMC Budget Fund)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.