Pune : पुण्यात कोरियन यूट्यूबर तरुणीशी गैरवर्तन…! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

366
पुण्याची (Pune) सांस्कृतिक शहर म्हणून जगभरात ओळख आहे. राज्यात परदेसी पर्यटकांना विशेष स्थान दिले जाते. मात्र असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका साऊथ कोरियन युट्यूबवर रस्त्यावर व्हिडिओ बनवत असताना एका तरुणाने तिच्या सोबत गैरवर्तन केल्याचा.प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी पाऊले उचलत संबधित तरुणाला तातडीने ताब्यात घेतले आहे. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरातील एका ठिकाणी कोरियन तरुणी यू ट्यूबसाठी व्हिडिओ बनवत होती. त्यावेळी तिने  नारळ पाणी पीत असताना दुकानदाराला सांगते की,  तुला भेटून आनंद झाला. हे बोलल्यावर संबंधित दुकानदाराने बाहेर येत तिच्या गळ्यात हात घातला. त्यानंतर ती कैली नावाची तरुणी त्याला नमस्कार करते आणि घटनास्थळावरून निघून जाते. असे व्हिडिओ पहायला मिळत आहे. तिथून बाहेर पडल्यानंतर तिने हा सर्व प्रकार सांगितला आहे. ती म्हणते की, त्या व्यक्तीला मला मिठी मारायची होती. मात्र, वेळीच निघाल्याने हा प्रकार टळला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल.मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी या. घटनेची दखल घेत संबधित दुकानदाराला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे पुणे (Pune) पर्यटकांसाठी कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.